# Video # जळगावकर पावसात चिंब

0

जळगाव : दि. 11 । प्रतिनिधी : आज दुपारी दीडवाजेपासून जळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाने बर्‍यापैकी जोर धरला.

रात्री दहा ते बारापर्यत मध्यम स्वरूपात पडल्यानंतर पहाटे पाच ते दुपारी दीड वाजेपर्यत ढगाळ वातावरण होते. दीड वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. तर दुपारी चार वाजेनंतर बर्‍यापैकी जोर धरला.

( व्हिडीओ संकलन : पंकज पाटील देशदूत डिजीटल, जळगाव)

जळगावकरांची उडाली धांदल

सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने आज पाऊस येण्याची शक्यता होती. परंतू दुपारी दीड दोन पर्यंत पावसाचा पत्ता नसल्याने ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज जळगावकरांनी बांधला होता. परंतू दुपारी तीन वाजेपासून पावसास सुरवात झाली. त्यामुळे विविध कामांसाठी बाहेर पडलेल्या जळगावकरांची चांगलीच धावपळ उडाली.

शेतकरी सुखावला

दरम्यान शहरवासीयांची धावपळ उडाली असली तरी शेतकरी मात्र सुखावला आहे.पेरणी केलेले बियांणांमधुन अंकुर रूजून जमिनीवर येईल. तर धुळपेरणी केलेले बियाणातील अंकुर जमिनीवर येवून या पावसाने चांगलेच जोम धरणार असल्याचे शेतकरी सांगतात.

 

LEAVE A REPLY

*