पीक विम्याच्या 12 कोटींचे गौडबंगाल : जिल्हा बँक व ओरिएन्टल कंपनीमध्ये वाद

0
जळगाव ।  प्रतिनिधी :  जिल्हा बँकेतून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांकडून गेल्या वर्षीच्या हंगामात पीककर्जाची 12 कोटींची रक्कम कपात करण्यात आली. कपात केलेली ही रक्कम शासनाने नेमलेल्या ओरीएन्टल कंपनीकडे भरणे आवश्यक होती. परंतु ही रक्कम जिल्हा बँकेकडून संबंधित कंपनीकडे जमाच केली नसल्याचा प्रकार पीक कर्जाच्या बैठकीत उघडकीस आला.दरम्यान जिल्हा बँक व ओरीएन्टल कंपनीमध्ये वाद सुरु असल्याने यांच्यातील गौडबंगल उघडकीस आले आहे.

खरीप हंगामासाठी गेल्यावर्षी शेतकर्‍यांनी जिल्हाबँकेकडून पीककर्ज घेतले होते. दरम्यान या कर्जाच्या रकमेतून बँकेने पीकविम्याची 12 कोटी रुपयांच्या पीककर्जाची रक्कम कपात करण्यात आली होती. कपात केलेली रक्कम जिल्हा बँकेने ओरीएन्टल कंपनीकडे अद्यापदेखील जमा झालेली नसल्याचा प्रकार सोमवारी झालेल्या पीककर्जाच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांसमोर उघडकीस आला.

त्यानंतर बँकेच्या अधिकारी व संबंधित कंपनीकडे विचारणा केली असता. त्यांच्यांमध्ये वाद सुरु असल्याचे समोर आले. दरम्यान ही रक्कम जिल्हा बँकेने संबंधित कंपनीकडे जमा झालेली आहे की नाही. दरम्यान हा घोळ नेमका कुठे व कशामूळे झाला. याबाबतची शहानिशा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

दरम्यान याबाबतचा खुलासा सादर करण्यासाठी त्यांच्याकडून दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये खुलासा सादर न केल्यास जिल्हाबँकेच्या कर्मचार्‍यांवर ग्राहक तक्रार मंचात तक्रार द्यायची की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचा याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.

दोन्हींकडून टोलवाटोलवी

गेल्यावर्षीच्या हंगामासाठी पीककर्जाच्या विम्याची 12 कोटीची जिल्हाबँकेकडून ओरीएन्टल कंपनीकडे जमा झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही रक्कम आमच्याकडे जमा झालेली नसल्याचे ओरीएन्टल कंपनीकडून सांगितले जात आहे. दोघांकडून एकमेकांकडे बोट दाखवीत टोलवाटोलवी करीत असल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसात अहवाल सादर न केल्यास गुन्हा दाखल

पीककर्जाच्या रकमेत झालेला घोळ कशामुळे झाला. याबाबत शहानिशा करुन त्याचा खुलासा सादर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. दोन दिवसात खुलासा सादर न झाल्यास ग्राहक तक्रार मंचात तक्रार दाखल करायची की, संबंधितांवर गुन्हा दाखल करायचा याबाबचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांकडून घेतला जाणार आहे.

ऑनलाईन असून देखील घोळ

जिल्हाबँकेची सर्व कामे आता ऑनलाईन झालेली आहे. पीकर्जाची कपात झालेली रक्कम जमा केल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित शेतकर्‍याला एसएमएसद्वारे देणे आवश्यक असते. परंतु जिल्हाबँकेकडून ऑनलाईन सुविधा असून देखील याप्रकरचा घोळ झाल्याने नेमके गौडबंगल काय असा सवाल जिल्हधिकार्‍यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

*