धानोरा परिसरातील शाळा करताच वीज चोरी

0
धानोरा|  वार्ताहर :  अंकलेश्‍वर-बर्‍हाणपुर या राज्य महामार्गावर आणि चोपडा तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकाला सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या धानोरा ता.चोपडा या जि.प. केंद्रीय शाळेसह परिसरातील १४ जि.प. शाळांना वीज मीटरच नसल्याने आधुनिक युगाकडे झेप घेऊ पाहणार्‍या देशातील वर्तमान काळ मात्र अंधारात असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल कसे होणार असा प्रश्‍न धानोरा परिसरतील शिक्षण प्रेमी आणि पालकांना पडला आहे.

जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातूनच शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात देखिल पोहचत आहे. यात तीळ मात्र शंका नाही. परंतु शिक्षणाचा दर्जा आणि सुविधांच्या बाबतीत सततचा दुष्काळ दिसुन येतो.

धानोरा भागातील जि.प. शाळा बघितल्यावर हा प्रश्‍न नक्की पडतो. की या सर्वशाळा मध्ये शिक्षण अभियाना अंतर्गत विविध फंडातून संगणक, प्रोजेक्टर आणलेले आहेत, मात्र कित्येक महिन्यांपासून ते झाकून ठेवले आहेत.

वीज पुरवठा नसल्याने ते चालु करणे शक्य नाही. परिणामी ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचा लाभ होत नाही. शाळांनी वेळोवेळी वीज बिलांसाठी पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाकडून त्याची दखल का घेतली जात नाही? हा मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

त्या शाळांचा पडला विसर-पुर्वीकाळापासून प्राथमिक शिक्षण हे जि.प. शाळांमधून दिले जात होते. आपल्यातील ९०% नागरिकांनी जि.प. शाळांमधूनच शिक्षण घेवून आज उच्च पदापर्यंत यश संपादन केले आहे. त्यात आमदार, खासदार, मंत्री यांचा देखिल समावेश आहे. त्यामध्ये सदस्य पदस्य शिक्षण विभागात मोठे अधिकारी देखिल आहेत. मात्र वरिल सर्वांना जि.प. शाळांमधून शिक्षण घेवून उच्च पदस्थ होण्याचा विसर पडलेला दिसुन येतो.

धानोरा सह परिसरातील देवगांव, पारगाव, बिडगाव, मोहरद, मितावली, पंचक, वरगव्हान, बडवाणी, गांदण्यातलाव, शेवरे बु., शेवरे पाडा, कुंड्यापाणी, बढई, पानशेवरी आदिशाळा असुन या शाळांमध्ये आज अंधाराची परिस्थिती बघायला मिळत आहे.

भारत समशितोळा पट्ट्यात असल्याने दिवसा भरपूर उजेड पडतो, त्यामुळे शाळा शिकवण्यात फार अडचण येत नाही. इतकीच जमेची जाबू होती, कौलारु शाळांनी तर एखादे कौल बाजुला करुन झरोका तयार केलाही विदारक वस्तु स्थिती आहे.

अशी होते वीज चोरी

शहरी अथवा ग्रामीण भागात कोणतीही निवडणुक असली की, त्या ठिकाणी मतदानाची गरज भासते, त्या करिता मतदान केंद्र हे जि.प. मराठी शाळांमध्ये असते. विजेवर चालणार्‍या मतदान यंत्रात मतदान करण्याची सोय आहे. ते यंत्र चालवायचे झाल्यास वीज हवीच आता ती चोरुन घेतांना कुणाचीही परवानगी न घेता थेट आकोडा टाकुन वीज पुरवठा सुरु करतात.

या आकोडा टाकुन वीज चोरी करण्यामुळे प्रशासनाचा अपमान होतो. त्याकरिता सरकारी यंत्रणा खाडकन जागी होणे अपेक्षित आहे. आजतागायत लहान मुलांच्या शिक्षणाच्या वाटेत आडकाठी ठरत असलेला प्रश्‍न निवडणुकीच्या निमित्ताने एका चुटकी सरशी सुटायला होणे गरजेचे आहे. परंतु गरज सरो वैद्य मरो म्हणी नुसार मतदान आटोपल्यावर कोणी पाठफिरवुन बघण्यास देखिल तयार होत नाहीत.

शिक्षकांसमोर सर्वात मोठा प्रश्‍न

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात प्राथमिक शाळेपासून होते. झपाट्याने वाढत चाललेल्या शैक्षणिक क्षेत्रात खाजगीकरण वाढत चालले आहे. अनेक पालक याकडे आकर्षित होत असले तरी अनेक पालक आज देखिल जि.प. शाळा मध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देत आहे.

तसा दर्जाही जि.प. शाळांनी टिकवून ठेवला आहे. खाजगी शाळांमध्ये जेवढ्या सुविधा उपलब्ध नसतात त्याहुन अधिक सुविधा जिल्हा परिषद शाळांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु त्याही प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे धुळ खात पडलेल्या आहेत. असे असतांना देखिल शाळा प्रवेशासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याचा अट्टाहास प्रशासनाकडून शिक्षकांकडे करण्यात येत असतो.

परंतु जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजी समोर वीज पुरवठा हा सर्वांत मोठा प्रश्‍न निर्माण झालेला दिसुन येतो. धानोरा शाळा परिसरातील गेंड्याच्या कातडीचे सोंग घेवून कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन आता तरी जागे होणार का? असा प्रश्‍न धानोरा वासियांना पडला आहे.

जि.प. सदस्यांनी लक्ष देण्याची गरज

धानोरा परिसरातील १४ जि.प. शाळांचा कारभार धानोरा केंद्र शाळेतुन चालीत असतो, या ठिकाणी केंद्र प्रमुखासाठी भव्य दालन देखिल बांधण्यात आले आहे.

येथूनच धानोरा परिसरातील जि.प. शाळामध्ये कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या नाहीत याची सखोल अशी माहिती मिळु शकते, त्या करीता अडावद-धानोरा जि.प. गटातील सदस्य आरोग्य सभापती दिलीप पाटील यांनी लक्ष देवून धानोरा परिसरातील जि.प. शाळेच्या समस्याबाबत जिल्हा परिषदेच्या मासिक सभेत आवाज उठविणे गरजेचे असल्याचे मत धानोरा परिसरातील शिक्षण प्रेमी, पालक वर्ग व्यक्त करित आहेत.

LEAVE A REPLY

*