Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव लोकशाहीसाठी घातकच : मा.गो. वैद्य

Share

नवी दिल्ली : लोकशाही शासन प्रणालीत कोणत्याही एका पक्षाचा लोकशाहीसाठी घातक असतो. त्यामुळे लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष प्रबळ असणे गरजेचे आहे. तीन राज्यातील विधानसभाा निवडणूकीत कॉग्रेसला मिळालेल्या यशामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व सिध्द झाले आहे. असे मत संघाचे माजी ज्येष्ठ प्रचारक मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान श्री. वैद्य यांच्या या मतामुळे राजकीय वर्तूळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर मा. गो. वैद्य यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तीन राज्यातील विजयामुळे काँग्रेसला राहुल गांधी यांच्या रूपाने मेहनत करणारा नेता मिळाला आहे.

ही या पक्षासाठी चांगली बाब आहे. लोकशाहीत दोन प्रमुख पक्ष प्रबळ असणे आवश्यक आहे. कोणत्याही एका पक्षाचा प्रभाव लोकशाहीसाठी हितकारक नाही, असे त्यांनी नमूद केले.

कोणताही पक्ष दीर्घ काळ सत्तेत राहू शकत नाही. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती आणि राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तन होत असते. एखादा पक्ष दीर्घ काळ सत्तेत राहू शकत नाही, हे निकालातून सिद्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवातून भाजपच्या नेत्यांनी काय धडा घ्यावा, असे त्यांना विचारले असता मी त्यांना काय सांगणार?  ही त्यांची  अंतर्गत बाब आहे असे सांगत वैद्य यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!