हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषणारी मशीन विकसित

0
लंडन | वृत्तसंस्था :  संपूर्ण जगात सध्या मजलवायू परिवर्तनङ्गच्या मुद्द्यावर जोरात चर्चा सुरू आहे. तमाम देशांना कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे जर झाले नाही तर भविष्यात ही समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मात्र, मस्विस स्टार्टअपङ्गने या समस्येवर नव्या पद्धतीचा आणि प्रभावी पर्याय शोधला आहे. स्विस स्टार्टअपने एक मोठी मशीन विकसित केली आहे. ही मशीन हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेते.

स्विस स्टार्टअप अंतर्गत कार्यरत असलेल्या मङ्गास्टङ्ग या कंपनीचे अधिकारी ऍडेल पिटर्स यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ज्यूरिच येथील मक्लाईमवर्क्स ले२ कलेक्टर्स मशीनङ्गला एका शिपिंग कंटेनरवर बसवण्यात आले आहे. या मशीनमध्ये असलेले लहान लहान पंखे हवा आत ओढून घेतात.

आत बसवण्यात आलेला स्पंजसारखे ङ्गिल्टर या हवेतून मकार्बन डायऑक्साईडङ्ग वायू शोषून घेतो. मशीनने शोषून घेतलेला कार्बन डायऑक्साईड शुद्ध करून तो विकलाही जाऊ शकतो; अन्यथा अन्य कामासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. उल्लेखनीय म्हणजे हा वायू जमिनीमध्ये गाढलाही जाऊ शकणार आहे.

जगभरातील एक टक्का कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी अशा साडेसात लाख शिपिंग कंटेनरची आवश्यकता आहे. मात्र, पृथ्वीला वाचवण्यासाठी भविष्यात असे प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

*