तरुणपिढी अंमली पदार्थांची शिकार

0
जयेश शिरसाळे  | जळगाव  :  देशाचे उज्ज्वल भावितव्य तरुणांच्या हाती आहे. परंतु अंमली पदार्थ सेवनाचे सर्वाधिक प्रमाण तरुण पिढीमध्ये असल्याने तरुण पिढी अंमली पदार्थांची शिकार होत आहे.

अंमली पदार्थामुळे तरुणांच्या बौध्दीक व शारिरीक क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आयुष्यांच्या वाटेवर तरुण पिढी अंमली पदार्थाच्या सेवनाने करीअर गमवितांना दिसत आहे.

जागतिक स्तरावर २६ जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे क्रियेशिलतेवर परिणाम होतो. केवळ जिज्ञासेपोटी या अंमली पदार्थांची चव चाखणारी तरुण पिढी अंमली पदार्थांच्या राक्षसी विळख्यात सापडली आहे.

त्यामुळे ही सामाजिक समस्या बनली आहे. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे केवळ शरीरावर नव्हे तर मानसिक, सामाजिक, अर्थिक तसेच कुटुंबावर देखील परिणाम होतो. तरुणांना अंमली पदार्थांपासून दुर करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. परंतु आवश्यक तितकी जनजागृती होतांना दिसत नाही.

मेट्रोसिटी मधील तरुण मोठया प्रमाणात अंमली पदार्थांचा शिकार होतांना दिसत आहे. रेव्ह पार्टी, हुंका पार्टीमध्ये अंमली पदार्थांची चव चाखणारे तरुण चांगलचे नशेच्या आहारी जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही अंमली पदार्थ सेवनाचे लोण पसरत आहे. ग्रामीण भागात चरस, अफु, गांजा सर्रासपणे विकला जातो. त्यामुळे तरुणपिढी याकडे आकर्षित होत आहे.

पालकांनी लक्ष देण्याची गरज

समाजविघातक अशा या अंमली पदार्थाच्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी जनजागृती महत्वाची असून युवापिढीला व्यसनमुक्तीचे केवळ धडे देवून भागणार नाही. यासाठी शिक्षण, संस्कार, मार्गदर्शन, समुपदेशन, पालकांचा आधार महत्चाचा ठरत आहे.

ई-सिगारेटवर निर्बंध घालणे आवश्यक

शासनाने ई- सिगारेट, हुंका बारवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. मेट्रोसिटीमध्ये तरुणांमध्ये सिगारेट, गांजाचे अधिक आकर्षण आहे. त्यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी जाते आणि शेवटी पश्‍चाताप होते.

त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे सुरवातीपासून लक्ष देवून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.
– डॉ. गोविंद मंत्री,  कॅन्सर तज्ञ
तरुणाईमध्ये अधिक आकर्षण

तंबाखु, सिगारेट, गांजा, चरसचे तरुणांमध्ये अधिक आकर्षण आहे. या अंमली पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण जळगाव जिल्हात कमी आहे. मोठया शहरांमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना दिला जाणार्‍या खर्चाबाबत पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. पॉकीटमनी म्हणून दिले जाणारे पैसे तरुण पिढी अंमली पदार्थांच्या सेवनासाठी वापरतांना दिसून येतात. नशेच्या आहाराची जावून तरुणपिढी आयुष्याच्या वळणावर आपले करीअर गमवितांना दिसत आहे.

– डॉ. निलेश चांडक, कॅन्सर तज्ञ

LEAVE A REPLY

*