पारोळ्याच्या टिटवी येथील महिलेचा खून करणार्‍यास जन्मठेप : अमळनेर न्यायालयाचा निकाल

0
पारोळा/ अमळनेर | प्रतिनिधी :  पारोळा तालुक्याील टिटवी येथील रहीवासी सुमनबाई गुलाब भिल हिचा खून केल्याबद्दल आरोपी सुखराम ज्योतीराम भिल रा. टिटवी ता. पारोळा यांस अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेवी शिक्षा सुनावली आहे.

२५ नोव्हेंबर २०१५ रोजी दुपारी २ ते अडीच वाजेच्या सुमारास सुमनबाई भिल या त्यांच्या शेतात काम करत असतांना फिर्यादी धनराज हिंमत पाटील हे तेथून जात असतांना त्यांनी पाहीले की सुखराम यांच्या हातात लाकडी खाटीचा माचवा घेवून सुमानबाईस मारत होता.

सुमानबाईच्या ओरडण्याच्या आवाजामुळे फिर्यादीने सुमानबाईच्या ओरडण्याच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तीथे गेल्यावर पाहिले असता सुखराम हा सुमानबाईला जमीनीवर निपचीत पाडून तिच्या पोटावर लाकडी माचवे मारत होता. तीच्या छातीवर गुडघा टेकवून तिचा गळा दोन्ही हातांनी दाबतांना पाहीले.

फिर्यादी येण्याची व त्याने पाहिल्याचे पाहताच आरोपीने माचवा फिर्यादीच्या शेतात फेकून पळ काढला. याबाबत अमळनेर न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी सुखराम यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दंडापोटी पाच हजार रूपये भरण्यास सांगितले. दंड न भरल्यास १ महिनेची शिक्षा सुनावली. सरकारी वकिल ऍड. किशोर आर. बागुल यांनी एकूण ८ साक्षिदार तपासले. त्यात महत्वाची साक्ष धनराज पाटील यांची होती.

LEAVE A REPLY

*