बोहरा समाजाकडून सुख-शांतीसाठी प्रार्थना

0
जळगाव |  प्रतिनिधी : बोहरा समाज बांधवांनी भवानी पेठेतील जैनी मस्जीद व शिवाजीनगरमधील हुसामी मस्जीद येथे ईदची नमाज अदा करून देशाच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना केली.

बोहरा समाज बांधवातर्फे आज रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक बोहरा बांधवाच्या घरातील एका व्यक्तीचे कुराण तोंडी पाठ असावे, जास्तीत जास्तवृक्ष रोपण करणे व ३ महिन्यानंतर येणार्‍या मोहरम सनामध्ये १० दिवस चालणार्‍या प्रवचनामध्ये प्रत्येक बोहरा बांधवांनी एकत्रिक यावे अशा सुचना बोहरा समाजाचे धर्मगुरु सैय्यदना मूफद्दल सैफुद्दीन साहेब यांनी दिल्या.

त्यानंतर बोहरा समाजाचे कोषाध्यक्ष युसुफ मकरा यांनी अध्यक्ष आमील साहेब मोहम्मद भाई यांनी ३० दिवस १५० वेळा नमाज व इतर धार्मिक विधी केल्याने त्यांचे आभार मानले.

तसेच सुरत येथेन आलेले बुर्‍हाणभाई व दुबई येथून आलेले मुर्तुजाभाई यांनी बोहरा बांधवांना ३० दिवस कुराण प्रशिक्षण दिल्याबद्दल देखील त्यांचे आभार मानले.

यवेळी मुर्तुजाभाई इज्जी, मोहीज आरसीवाला, गुलामअब्बास लेहरी, तैय्यब मास्टर, मूस्ताक सादीकोठ, शब्बदी बदामी, अब्दुलकादर भावनगरवाला, मोईज खामगाववाला, डॉ. मुरतुझा अमरेलीवाला, अब्बास कादीयानी, मुरतुझा बंदुकवाला अजगर अमरेलीवाला यांच्यासह बोहरी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होतेे.

त्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना घरी जावून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

*