माजी आमदार पुत्राच्या कारला अपघात : पारोळ्याचे अमोल पाटील जखमी ; पोखरी फाट्याजवळील घटना

0
जळगाव | प्रतिनिधी : पारोळाचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल यांच्या कारचा अपघात झाला. यात ते जखमी झाले. ही घटना सायंकाळी  पाळधी जवळील पोखरी फाट्याजवळ घडली. पाटील यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील हे त्यांच्या कार (एमएच.१९.सीयू. ६९००) ने पारोळा येथून जळगाव येत होते. दरम्यान भुसावळ येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मुलगी हर्षा हिचे दोन ते तीन दिवसानंतर लग्न आहे.

त्यामुळे लग्नाचे साहित्य घेवून चालक मनोहर ठाकूर हा आयशर (एम.एच.१९.झेड.९६२३) घेवून नाशिक येथे जाण्यासाठी निघाला होता. पाळधी गावाजवळून जात असतांना पोखरी फाट्याजवळील युगश्री वेअर हाऊससमोर आयशरला अमोल यांच्या कारने धडक दिली. धडक जोरदार असल्यामुळे कारच्या ड्रायव्हर साईडचे नुकसान झाले आणी एअर बॅग उघडली गेली.

एअर बॅगमुळे अमोल यांना गंभीर जखम झाली नाही. परंतु त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव सुरू झाला. याच दरम्यान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील हे त्या रस्त्यावरून जात असतांनाच त्यांना अपघात झाल्याचे दिसले.

तर माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मुलाची कार असल्याचे कळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अमोल पाटील यांना रक्तबंबाळ अवस्थेत उचलून रूग्णवाहिकेत बसविले आणि जळगावातील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, अमोल पाटील यांच्या कारचा अपघात झाल्याचे माहिती मिळताच चिमणराव पाटील व नातेवाईकांनी तसेच कार्यकर्त्यांनी रूग्णालयात धाव घेत गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*