चोपडा-अमळनेर रस्त्यावर वेलेजवळ तिघांना चिरडले

0
चहार्डी, ता.चोपडा |  प्रतिनिधी  :  शनिवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास चोपडा-अमळनेर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने पायदळी जाणार्‍या तिघांना चिरडले असून,अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.त्यात एक इसम व दोन बालकांचा समावेश आहे . मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही .

दि.२४ रोजी रात्री सुमारे एक ते दीड वाजेच्या सुमारास चोपडा-अमळनेर रस्त्यावर वेलेपासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावर पायदळ चालणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक अज्ञात पुरुष वय ४५ , पाच वर्षांचा मुलगा व आठ वर्षाची मुलगी असा तिघांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. तिघा मृतांचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवागारात ठेवण्यात आले आहे.

वेलेजवळ अपघात झाल्याचा दूरध्वनी शनिवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन आला. लागलीच पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, ए.पी.आय. रामकृष्ण पवार, सुजित ठाकरे, पो.हे.कॉ. मंगलेश शिंदे, पो.कॉ. किशोर पाटील, राजू महाजन तसेच सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर, वेले-आखतवाडे येथील पोलीस पाटील नितीन आबाजीराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

अपघातातील छिन्नविच्छिन्न रस्त्यावर पडलेली मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला वेले-आखतवाडे येथील पोलीस पाटील नितीन आबाजीराव पाटील यांच्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत इसमाच्या पेहरावावरून आदिवासी पावरा जातीचा असून बाप व त्याची दोन लहान मुले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*