बेलगंगा सुरु न होऊ देण्यासाठी, आमदारांची आडकाठी : चित्रसेन पाटील

0
चाळीसगाव । दि. 13। प्रतिनिधी :  जिल्हा बॅकेतर्फे बेलगंगा साखर कारखाना विक्री प्रक्रियेच्या निविदा पासून ते विक्री प्रक्रिया पार पाडे पर्यंत आमदार उन्मेष पाटील यांनी विरोध केला नाही, तोपर्यंत ते मुग गिळुन गप्प बसले होते. आम्ही भुमीपुत्र चाळीस कोटी उभे करुन कारखाना सुरु करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. मात्र कारखाना सुरु केला नाही म्हणून राजकिय नूकसान होण्याची भिती डोळ्यापुढे दिसत असल्याने, आता आमदार उन्मेष पाटील हे कारखाना संबंधीत शासन दरबारी तांत्रिका अडचणी निर्माण असून कारखाना सुरु होऊ नये यासाठी आडकाठी घालत असल्याचा गंभीर आरोप अंबाजी शृंगरचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी केला आहे.

बेलगंगा(अंबाजी शृगर) कारखाना सुरु होण्याचे पाहिले पाऊल अंबाजी शृगरने टाकले असून त्याअनुषंगाने बुधवारी संकाळी 10.30 वा.मिल रोल(यंत्र) पूजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूजनाच्या कार्यक्रमानतंर चित्रसेन पाटील पत्रकारांनी बोलत होते. मिल रोल पूजन उद्योजक प्रविणभाई पटेल व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते झाले.

पूजनासाठी अंबाजी शृगरचे यु.डी.माळी, दिलीप चौधरी, किरण देशमुख, केदारसिंग पाटील, निलेश निकम, अजय शुक्ल, विजय अग्रवाल, प्रेमचंद खिवसरा, यु.डी.माळी, अशोक ब्राम्हणकार, राजेंद्र धामणे यांच्यासह अंबाजी शृगरचे सर्व भागीदार उपस्थित होते. मिल रोल पूजनानतंर अंबाजी शृगरचे कार्यकारी संचालक नामदेव पाटील, विभाग प्रमुख अर्जुन शिंदे, अशोक मेमाने, शेतकी अधिकारी सुभाष भाकरे यांनी सर्वांना कारखानाची सद्यस्थितीची विभागवार माहिती दिली तसेच येत्या ऑक्टोंबर मध्ये काम पूर्ण होणार असल्याचे सांगीतले.

पुढे माहिती देताना चित्रसेन पाटील म्हणाले की, बेलगंगा कारखाना चालू होऊ न देण्यासाठी जनशक्ती विरुध्द प्रस्थापित राजकारणी अशी लढाई आता सुरु झाली आहे. आमदार उन्मेष पाटील यांच नावे मी आतापर्यत घेतले नाही. परंतू आता मला जाणीवपूर्वक त्यांचे नाव घ्यावे लागत आहे. यामागचे कारण म्हणजे विधान सभेत त्यांनी अतारांकित प्रश्न क्र.99777 मध्ये कारखानाच्या अवैद्य विक्री बाबत प्रश्न उपस्थित केला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जळगाव जिल्हा बॅकेत भाजपाचे आमदार, खासदार संचालक मंडळात आहेत, मग त्यांच्यावर कारवाईची मागणी आमदरांनी केली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा बॅकेने कारखान्याच्या विक्री संबंधीत निविदा प्रक्रिया पार पाडली, तोपर्यंत ते गप्प होते. त्यावेळेस आम्ही 40 कोटी उभे करुन शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता.

परतू आता आम्ही 40 कोटी उभे करुन, कारखाना सुरु करण्याच्या मार्गावर असताना ते आता राजकिय स्वार्थासाठी कारखाना सुरु होऊ नये म्हणून पूर्णपणे प्रयत्न करीत असल्याचे चित्रसेन पाटील यांनी सांगीतले.

युनियनच्या मागेेही आमदाराच

बेलगंगचे माजी काही कर्मचारी आता कारखान्यात काम करीत आहेत. आमदार उन्मेष पाटील यांनी बेलगंगा कर्मचारी युनियनच्या लोकांना हाताशी धरुन कारखान सुरु होऊ न देण्यासाठी सुप्रिम कोर्टा पर्यंत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे युनियनच्या मागेही आमदार उन्मेष पाटील यांच्याच हात असल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला.

राजकिय दुखण्यासाठी काखान्याचे जाणीवपूर्वक नुकसान

बेलगंगा कारखान्यातील 160 के.व्ही.विज तयार करणारे टरबाईनचेे तांब्याचे तार व इतर साहित्यांचे नुकसान हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. हे नूकसान कारखान्यासंबंधीत जानकारानेच केले असून ठिकाणी जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे केवळ राजकिय दुखाण्यासाठी करण्यात आले असून यामागेे मोठे षंडयंत्र आहे.

परंतू कितीही अडथळे आनले, तरी येत्या ऑक्टोबर पर्यंत आम्ही शंभर टक्के कारखाना चालू करण्याचा प्रयत्न, आमच्या परिने करनार आहोत. परंतू शासन दरबारी आशा तांत्रिक अडचणी निर्माण केल्या गेल्या, तर आम्हाला मात्र नाईलाज होईल असेही यावेळी चित्रसेन पाटील यांनी सांगीतले.

आमदार कमी पडते होते, म्हणून त्यांनी सोबतीला रामकृष्ण पाटीलला घेतले

बेलगंगा सुरु होऊ नये म्हणून आमदार उन्मेष पाटील हे कमी पडत असल्यामुळे त्यांनी माजी मंत्री एम.के.पाटील यांचे पुत्र रामकृष्ण पाटील यांना आता सोबतील घेतल आहे. रामकृष्ण पाटील यांनी बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठाणच्यावतीने नुकतीत शासन दरबारी बेलगंगेच्या शेतजमिन गट क्रं.74,75,76,78,79 यावर फेर घेण्यास हरकत घेतली आहे. न्यायालयीन आदेशाशिवाय कोणताही फेर किवा नोंद घेवू नये अशी मागणी केली आहे. परंतू ही हरकत जनहितासाठी नसून त्यांच्या खाजगी मालमत्तेसाठी असल्याचाही आरोप चित्रसेन पाटील यांनी केला आहे.

बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठाणच्या नावे जमिन झालीच कशी?

बेलगंगा सहकारी साखर कारखानाच्या एकून जमिनी पैकी शेजजमिन गट क्रं.80 हा साधरणाता; सन 1980-082 मध्ये मा.मंत्री.एम.के.पाटील यांच्या खाजगी बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठाण नावे बेकायदेशिर ठराव करुन करण्यात आला आहे. बेलगंगा ग्रामीण विकास प्रतिष्ठाणची ईमारत बांधण्यापासून ते सन 1998-099 पर्यंत विजेचे बिल, पाण्याचे बिल व इतर सुविधा हे बेलगंगा कारखान्याच्या पैशांनी ह्या खाजगी प्रतिष्ठानला पुरविण्यात आल्याचा गंभीर आरोप बेलगंगेचे माजी.एम.डी.नामदेव पाटील यांनी केला आहे.

हा प्रकार लक्षात आल्यावर त्यावेळेस मी ह्या सुविधा तत्काळ थांबविल्या होत्या. व त्यासंबंधीचा अहवाल मा.चेअरमन स्व.अनिल देशमुख यांच्याकडेे दिला होता. त्यांनी नतंर बेलगंगा प्रतिष्ठाण देण्यात आलेला गट क्र.80 चा ठराव हा बेकायदेशिर असल्याचा ठरावही केल्याचे त्यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*