#Breaking Video # आपल्याला त्रास देणार्‍या मंत्र्यांसह सर्वांना धडा शिकविणार- पत्रकार परिषदेत आ. खडसे

0
 भुसावळ । दि.30 । प्रतिनिधी :   40 वर्षाच्या राजकीय कारकिदीत आपल्यावर एकही आरोप, दोष नाहीत. मात्र आपल्याला बदनाम करुन मंत्रीपदाचा राजिनामा देण्यासाठी कट रचला गेला होता. यात प्रकरणात समाजात आपला अपमान, बदनामी झाली असून आपल्याला मनस्ताप झाला आहे. याबाबत आपण कायदेशीर मार्गाने संघर्ष करणार असून संबंधितांना धडा शिकविणार आहे. तसेच तथाकथीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 2016 साली आपल्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलल्या याचिकेत बनावट कागदत्र व चेक सादर केल्या प्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशाने मुक्ताईनगर पोलिसात दमानियांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी दिला.

ते भुसावळ तालुका भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अंजनी दमानिया केवळमात्र एक प्यादे आहे. मुख्य सुत्रधार एक मंत्री आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा कट होता. याबाबत समाजिक कार्यकर्त्या कल्पना ईनामदार यांनी गौप्यस्फोट केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 2016 साली माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या विरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेतील कागदपत्रे व चेक बनावट होती.हे तत्कालीन पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

विद्यामान पोलिस अधिक्षक दबावाखाली काम करित असून याबातब संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने आपण मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला होता

सहा जणांविरूध्द गुन्हा

न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलिसात. दि. 13 जून रोजी मुक्ताईनगर पोलिसात सामजिक कार्यकर्त्या अंजली अनिष दमानिया, रोशनी राऊत, (रा. कळवा, ठाणे), गजानन पुंडीलिक मालपुरे (रा.जळगाव), सुशांत परशुराम कुर्‍हाडे (रा. मुंबई), सदाशिव व्यंकट सुब्रमनियम (रा. वाशी, नवी मुंबई), चारमैन फर्नस (रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) या सहा जणांविरुद्ध भा.दं.वि 379, 380, 420, 265, 466, 467, 468, 469, 471, 472 आणि 474 सह कलब 120 ब, 120ड, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात एका मंत्र्याचा हात असल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री यांना भेटून चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या घटनाचक्रातील सुत्रधार कोण याची आपल्याला माहिती आहे. मात्र चौकशी अंती ते लवकरच समोर येईल असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*