भुसावळात गुन्हेगारांचा हैदोस : मध्यरात्री गोळीबार !

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  शहरातील भारत नगरात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या तीन गुन्हेगारांनी गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार केल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार गुन्हेगारांनी हवेत तीन ङ्गैरी झाडल्या. राजेंद्र नामदेव काटकर या भाजी विक्रेत्यावर गावठी बंदुक रोखत त्यांच्या घरातील सामानाची तोडङ्गोड करण्यात आली व दुचाकीचे नुकसान करण्यात आले.

गुन्हेगारांचा हा थरार पाहुन सीमा चौधरी नामक महिला जागेवरच बेशुद्ध पडल्या. गुन्हेगारांनी भारत नगरातील नागरिकांच्या दुचाकी अडवत त्यांना शिवीगाळ केली. पोलीस निरीक्षक वसंत मोरे व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील भारत नगर परिसरातील नागरिक झोपलेले असतांना त्यांना अचानक गोळीबाराचा आवाज आला.

त्यामुळे नागरिक घराबाहेर आले असता पोलीस दप्तरी फरार असलेल्या तीन गुन्हेगारांनी गावठी कट्यातून तुफान गोळीबार केल्याचे दिसून आले. नागरिकांवर दहशत बसविण्यासाठी हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गोळीबार करुन आरोपी पसार झाल्याचे बोलले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत फरार आरोपींचा तपास सुरु होता.

दरम्यान उद्या ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त असतांना देखील नागरी वस्तीत रात्रीच्या सुमारास सर्रास गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*