लोंबलेल्या विजतारांनी घेतला शेतकर्‍याचा जीव

0
वाकोद, ता. जामनेर, | प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या कुंभारी धरणाजवळ लोबंकळणार्‍या विज प्रवाह सुरु असलेल्या व जमिनीवर पडलेल्या तारांना शेतात जात असलेल्या शेतकर्‍याचा स्पर्श झाल्याने कुंभारी खु. (ता. जामनेर) येथील रोहिदास नथू चव्हाण (३५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी घडली.

शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास परिसरात वारा वादळासह पाऊस झाला होता. वादळ जोरात असल्याने विजेची लोबंकळनारी तारा जमिनीवर पडलेली होती.

कुंभारी धरण परिसरात रोहिदास चव्हाण हे शेतात कामा साठी जात असतांना पडलेल्या तारांचा स्पर्श त्यांना झाला. या तारामध्ये विज प्रवाह सुरु असल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यु झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून ही घटना दुपारी २.३० वाजेनंतर घडली असल्याचे समजते. मात्र संध्याकाळी ६ वाजेनंतर पहुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पहुर पोलिस करीत आहेत. रोहिदास हे गरीब कुटुंबातील असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.

लोंबकळणार्‍या तारा ठरताय जीव घेण्या- विज वितरण कंपनीच्या तारा अनेक ठिकाणी लोंबकळत असून जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी या जीवघेण्या ठरत आहेत.

वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील विज कंपनीला कोणत्याच प्रकारचे सोयरे सूतक नसून याची दखल घेतली जात नसल्याने लोंबकळनारी जीर्ण तारा जीवावर उठलेली दिसत आहे.

LEAVE A REPLY

*