शेतकर्‍यांचा ७/१२ कोरा करा : यावल पं.स.च्या सभेत ठराव

0

यावल | प्रतिनिधी : यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत शासनाने शेतकर्‍यांचे कर्जमाङ्ग करुन ७ / १२ उतारा कोरा करावा यासह विविध विषयाला छेडून मासिक सभा पं.स. सभापती संध्या किशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

शेतकर्‍यांचा ७/१२ शासनाने कोरा करावा असा ठराव होऊन तो शासनाला पाठवावा, तालुक्यातील मराठी शाळांची दयनिय अवस्था झाली असुन कुठला अनर्थ झाल्यास शिक्षणयय विभागावरच कारवाई करावी, आरोग्य विभागाची सिकलसेल मोहिम तालुकाभर राबवावी, पं.स.सदस्यांना तुटपूंजी शेष ङ्गंडाची रक्कम मिळते त्यात १०/१२ गावांमध्ये या तुटपुंजी रक्कमेत पं.स.सदस्य काय विकास करणार? शासनाने या रक्कमेत वाढ करावी अन्यथा ही रक्कम तिजोरीत जमा करावी.

या प्रमुख विषयांवर चर्चा होवुन तालुकाभरातून काही ठरावीक व्यक्ती पं.स.मध्ये घरकुल, शौचालय इ. कामे घेवून दलाली करु पाहतात. व अधिकार्‍यांना धमकवितात. अशांवर कारवाई करावी व घरकुल डाटा ऑपरेटर मिलींद कुरकुरे यांस एका ईसमानेे धमकी दिली त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करावा असे चर्चेत ठरले.

तालुक्यातील मोहराळा येथील मयत गयनाबाई सुपडू तडवी यांच्या नावाची ग्रा.पं.मोहराळा येथील मयत गयनाबाई सुपडू तडवी यांच्या नावाची ग्रा.पं.हद्दी जागा होती. २००७ च्या दरम्यान रुबाब तडवी यांच्या अर्जावरुन ग्रा.पं. मोहराळा यांनी सदरील जागेतील अर्धी जागा रुबाब तडवी यांच्या नावे करणे बाबत सर्वानुमते ठराव केला आहे.

त्यात ग्रामसेवकाने त्यांचे वारस आहेत किंवा नाही या बाबत खुलासा करावा. तसा खुलासा नाही. मालमत्ता हस्तातंरण कायद्यानुसार कुठलेही कागदपत्रके व खरेदी खताचे कागद, अर्जदाराने सादर केलेले नसुन त्यामुळे ठराव करता येणार नाही असे सभासदांनी सुचीत केले.

मात्र हा ठराव सर्वानुमते संमत केला. ग्रामसेवकाने हा ठराव झाल्यावर पं.स.बीडीओकडे अभिप्राय मागणे गरजेचा होता. तसेच सौखेडा ग्रा.पं.सरपंचाचे परवानगी शिवाय कोणतेही कागदपत्रके देण्यात येवू नये असा ठराव करण्यात आला असुन तो बेकायदेशिर आहे.

त्याची चौकशी करावी असे आयत्यावेळी शेखर पाटील यांनी उपस्थिीत केले. सभापती यांनी याबाबतीत बीडीओंना चौकशीचे आदेश दिलेत.यावेळी उपसभापती छोटू आबा पाटील सह ८ सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*