पीक विम्यासाठी शेतकर्‍यांना ३१ जुलैपर्यंतची मुदत

0

जळगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असून नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ३१ जुलै पूर्वी सहभागी होवून लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने खरिप हंगाम २०१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना दि. ओरिएन्टल इंन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत सहभाग होण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै अशी आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणार्‍या शेतकर्‍यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१७ मध्ये राबविण्यात येत आहे.

असा आहे पीक विमा हप्ता

पिकाचे नाव – खरिप ज्वारी २४ हजार, ४८०. बाजरी २० हजार, ४००.सोयाबीन ४० हजार, ८००. भुईमुग ३० हजार, ६००. तीळ २२ हजार, ४४०. मुग १८ हजार ३६०. उडिद १८ हजार ३६०. तुर ३० हजार, ६००. कापुस ४० हजार, १४३६ आणि मका २१ हजार ५०० या प्रमाणे आहे.

शेतकर्‍यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, (सर्व तालुका), उपविभागीय कृषी अधिकारी, जळगाव,पाचोरा,अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी याठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनीकेले आहे.

LEAVE A REPLY

*