जळगाव मनपा हद्दीतील ‘ते’ अविर्गकृत सहा रस्ते शासनाने पुन्हा केले बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत

0

जळगाव | प्रतिनिधी :  जळगाव महापालिकेकडे देखभाल व दूरूस्तीसाठी वर्ग केलेले ते सहा रस्ते शासनाने जनरेटा आणि महापालिकेच्या महासभेच्या ठरावानुसार पुन्हा सार्वजनीक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केेले आहे. त्याबाबतचा शासन आदेश आज निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे या सहा रस्त्यांवरील दारूची दुकाने बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गापासून ५०० मिटर अंतरावर असलेली सर्व दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय दिला होता. या दुकानांना आता नव्याने दारू विक्रीचे परवाने न देण्याचाही निकाल न्यायालयाने दिला होता.

या निर्णयामुळे जळगाव शहरातील सहा रस्त्यांवरील दारूची दुकाने कायमची बंद होणार होती. परंतू शहराच्या लोकप्रतिनिधींनी दारूविके्रत्यांची बाजू घेत याबाबत शासनाकडे व बांधकाम विभागाकडे सदर रस्ते अवर्गिकृत करून रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न केला होता.

त्यांची शासनासह बांधकाम विभागाने ताताकाळ दखल घेत हे रस्ते ३१ मार्च २०१७ रोजी महापालिकेकडे वर्ग केले होते. याबाबत शासन किंवा बांधकाम विभागाने महापालिकेचे मत विचारात घेतले नव्हते.

जनमताचा रेटा आणि महापालिकेचा ठराव

दरम्यान या विरोधात जळगाव शहरातील जनमत हे सबंधित लोकप्रतिनिधीसह शासनाच्या विरोधात जाऊ लागले होते. तर महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असल्याने या रस्त्यांची देखभाल व दूरूस्ती करणे महापालिकेला शक्य नव्हते.

परिणामी महापालिकेच्या महासभेनेही या शासन निर्णयास महासभेत ठराव करून विरोध केला.

या सर्व बाबींमुळे अखेरीस शासनाने महापालिकेकडे वर्ग केलेले रस्ते पुन्हा बांधाकम विभागाकडे वर्ग केले आहेत.

LEAVE A REPLY

*