# Video # अन् त्यांनी केले गाईचे डोहाळे जेवण : न्हावीच्या प्रकाश तळेले व उज्वला तळेले यांचे गो प्रेम

0
ललित फिरके | न्हावी, ता. यावल । वार्ताहर :  हिंदु धर्मात गायीला माता समजले जाते. गाईच्या उदरात 36 कोटी देवांचा निवास असल्याचे मानले जाते. त्यामुळे गाईची पूजा म्हणजे या सर्व देवांची पूजा केल्याचे पूण्य मिळत अणल्याचा समज आहे. गाय ही कामधेनूहीही समजली जाते. त्यामुळे अशा गायीवर गोपालक आपल्या कुटूंबातील सदस्यांप्रमाणे तीची काळजी घेत असतात.

असाचा प्रकार न्हावी येथे पहावायस मिळाला.येथील रहिवासी प्रकाश तळेले व त्यांच्या पत्नी यांनी आपल्या गाभण गाईचे चक्क डोहाळे पुरविले आहेत.

प्रकाश तळेले व उज्वला तळेले यांची गाय सात महिन्यांची गाभण आहे. आता अधिक मास सुरू असल्याने त्यांनी आपल्या गायीचे डोहाळे पुरविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी गायीला हिरवी लाल साडी नेसविली. शिंगांना गळ्यात फुलांच्या माळा घालून सजविले. चारही पायात बाजु बंद सारख्या फुलांच्या माळाही बांधल्यात.

आजुबाजुच्या लोकांना गायीच्या डोहाळे जेवणासाठीचे खास आमंत्रणही दिले. त्यानुसार ब्राम्हणवृंदाच्या मंत्रोच्चारात त्यांनी गायीचे डोहाळे पुरविले. गायीची अधिक मासानिमित्ताने विधीवत पूजा करून पूण्य पदरात पाडून घेतले.

अन शिर्‍याचे दिले जेवण

गाईची विधीवत पूजा करण्यावरच हे दाम्पत्य थांबले नाही तर त्यांनी परिरातील लोकांना वरण बट्टी, वांग्याची भाजी व गोड म्हणून शिर्‍याचे जेवण दिले.

परिवाराने साजरे केले डोहाळे जेवण

गायीच्या डोहाळ्यांसाठी प्रकाश तळेले, उज्वला तळेले, त्यांचा मुलगा चेतन तळेले यांनी मोठ्या उत्साहात काम केले. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरीकांनी कौतूक केले असून गावात या आगळ्या वेगळ्या गायीच्या डोहाळे जेवणाची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

*