जळगाव जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पेरण्या : पावसाची प्रतीक्षा : दुबार पेरणीचे संकट

0
जळगाव | | प्रतिनिधी : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३२.४० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आला आहे. पावसाअभावी शेतकर्‍यावर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरण्या पुन्हा एकदा लांबल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे.
खरिप हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ लाख ४४ हजार हेक्टरपैकी २ लाख ७३ हजार हेक्टर म्हणजेच ३२.४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७५.९ टक्के पेरण्या झाल्या असून बोदवड तालुक्यात सर्वात कमी २.९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

दुबार पेरणीचे संकट

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारकडून कर्जमाफीच्या केवळ घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेला नाही.
दुसरीकडे पावसाने देखील शेतकर्‍यांना आकाशाकडे बघायला भाग पाडले आहे. त्यामुळे शेतकर्‍यावर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

तालुका टक्केवारीतालुका टक्केवारी

जळगाव ८.९७ भुसावळ ९.०१ बोदवड २.५७ यावल ६.२६ रावेर २१.२३ मुक्ताईनगर ७.४० अमळनेर ६.९४ चोपडा १७.३४ एरंडोल २७.२४ धरणगाव ८.५८ पारोळा १४.८१ चाळीसगाव ६८.५४ जामनेर ७५.०९ पाचोरा ७२.०१ भडगाव ५७.३९ एकूण ३२.४०

LEAVE A REPLY

*