धाबे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना रोज मिळते सोनपापडी

0
शेळावे,ता.पारोळा | वार्ताहर :  धाबे (ता.पारोळा) शाळेत उपस्थिती व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम दरवर्षी राबविली जातात. सहसा शनिवारी व प्रसंगानुरुप सकाळची शाळा असली तर मुले शाळेत येत नाही व उशिरा येतात त्यामुळे मागच्या शैक्षणिक वर्षात सकाळी शाळेत लवकर येणार्‍या विदयार्थीना चारचाकी गाडीवर दुरपर्यंत रपेट मारुन आणण्याचा उपक्रम आम्ही राबविला.

या शैक्षणिक बर्षात शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुखे यांनी शालेय पोषण आहार व्यतीरीक्त वर्षभर स्वखर्चाने सकाळी लवकर व शाळेत येणार्‍या विदयार्थीना त्यांची आवडती सोनपापडी वाटपाचा कार्यक्रम राबविणे पाहिल्या शनिवार पासून सुरु केला आहे.

विदयार्थ्यांना हे खुप आवडले, आज तर बालवाडीची व इतर लहान मुलेही उपस्थित होती. तसेच वर्गात चार चार विद्यार्थ्यांचे गट पाडून एक गटनेता नेमुन तो त्यांचा अभ्यास घेईल, त्यांच्यातला कोणी घरी राहीला तर तो त्याला बोलावेल.

शाळा सुटल्यावर रिकाम्या वेळात तो गट आलटून पालटून एकमेकांच्या घरी अभ्यास होमवर्क पाढे पाठांतर करेल. शाळेत शिक्षक त्यांचा अभ्यास तपासतील, अडचणी सोडवितील, मार्गदर्शन करतील. सर्व शैक्षणिक कार्यक्रमात सहकारी शिक्षक सुदेश पाटील यांचे सहकार्य लाभते.

LEAVE A REPLY

*