अमेरिकेतील जोडप्याच्या विविध देशातील रितीरिवाजांनी विवाह

0
न्यूयॉर्क | वृत्तसंस्था :  हे छायाचित्र अमेरिकेतील जोडपे गॅब्रिएला सँडबर्ग आणि टिमोथी टॉमलिन यांचे आहे. सध्या हे जोडपे चाळीस दिवसांच्या हॉलिडे वेडिंगवर आहे. सात वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तेथील रीतिरिवाजांनुसार लग्न करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

त्यापैकी पाच देशांमध्ये त्यांनी गेल्या तीस दिवसांच्या काळात असा विवाह केला आहे. पुढील दहा दिवसांमध्ये ते आणखी दोन देशांमध्ये जाऊन तेथील रीतीनुसार विवाह करणार आहेत.

टिमोथीने याबाबत सांगितले की, सात वर्षांपूर्वी त्यांनी वाङ्निश्‍चय केला होता. मात्र, लग्नाचे नियोजन करण्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली.

२७ वर्षांच्या गॅब्रिएलाने सांगितले की, त्यांच्या प्रत्येक विवाहावेळी अमेरिकेतून त्यांचा कुणीतरी नातेवाईक किंवा मित्र येतोच. मात्र, अद्याप दोघांचेही आई-वडील एकाही लग्नात सहभागी झालेले नाहीत.

ते आता झेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात आणि नेदरलँडमधील ऍम्स्टरडॅममध्ये होणार्या लग्नात सहभागी होतील. या दोघांनी १८ मे रोजी सर्वप्रथम जपानमध्ये शिंतो धर्मानुसार लग्न केले.

केनियात मसाई समुदायाच्या रीतीनुसारही त्यांनी लग्न केले. त्यानंतर इंडोनेशिया आणि नेपाळमध्ये ते विवाहबद्ध झाले. तेथून ते चेन्नईत आले आणि ८ जूनला त्यांनी वैदिक पद्धतीने व दक्षिण भारतीय रीतिरिवाजानुसार विवाह केला. प्रागमध्ये हॉट एअर बलूनमध्ये लग्न करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

ऍम्स्टरडॅममध्ये ते चर्चमध्ये विवाह करणार आहेत.

LEAVE A REPLY

*