पृथ्वीवर दीर्घकाळ राहणे शक्य नाही : स्टीङ्गन हॉकिंग

0
लंडन | वृत्तसंस्था :  ब्रिटिश संशोधक स्टीङ्गन हॉकिंग यांनी म्हटले आहे की, मानवाच्या उन्नतीसाठी २०२० पर्यंत जगभरातील देशांनी आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर आणि २०२५ पर्यंत मंगळावर पाठवावे.

मानवाला जर आणखी दहा लाख वर्षे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याची इच्छा असेल तर माणसाला पृथ्वी सोडून अन्यत्र जावेच लागेल. अंतराळ संशोधन क्षेत्रामुळे हे ध्येय गाठता येऊ शकेल. नॉर्वेत स्टारमस ङ्गेस्टिव्हलमध्ये व्याख्यान देत असताना स्टीङ्गन हॉकिंग त्यांनी हे मत व्यक्त केले.

ते म्हणाले, एकाच ध्येयाने जगातील सर्व स्पर्धक देश एकत्र येतील, अशी आशा आहे. हे ध्येय म्हणजे मानवाचे अस्तित्व टिकवणे आणि परग्रहांवर वसाहत करणे आपल्या सर्वांसमोर एकच समान आव्हान आहे. आणि सर्व जगाला एकजूट होऊन त्याचा सामना करावा लागेल.

पृथ्वीवर आपण आता आणखी दीर्घकाळ राहू शकणार नाही. याचे कारण म्हणजे पृथ्वीला पुन्हा एकदा एखाद्या लघुग्रहाची धडक होऊ शकेल किंवा आपल्याच सूर्याच्या ज्वाळांनी जीवसृष्टी होरपळून नष्ट होऊ शकेल. त्यामुळे माणसाने आता वेळीच अन्यत्र आश्रय शोधला पाहिजे.

LEAVE A REPLY

*