ब्राझिलचा फुटबॉल स्टार रोनाल्डिनो करणार दोघा प्रेयसींशी विवाह

0
नवी दिल्ली : ब्राझिलचा फुटबॉल स्टार रोनाल्डिनो हा येत्या ऑगस्टमध्ये तब्बल दोन प्रेयसींशी विवाहबध्द होणार आहे. या दोघींही त्याच्यासोबत विवाहबध्द होणार आहेत. मात्र रोनाल्डिनोच्या घरच्यांना हे मान्य नसल्याने ते या विवाहास उपस्थित राहणार नाहीत.

३८ वर्षीय रोनाल्डिनोच्या या दोन्ही भावी बायका त्याच्या प्रेयसी आहेत. बिट्रिजा सुजा आणि प्रिस्किला कोएलो अशी त्यांची नावं आहेत. हे तिघेही डिसेंबर २०१७पासून रिओ दी जनेरोमध्ये एकत्र राहतात. प्रिस्कीला आणि रोनाल्डिनो बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत तर, बिट्रिजा आणि रोनाल्डिनोची भेट २०१६ साली झाली होती.

या दोघींनाही खर्चासाठी रोनाल्डिनो दरमहा १ लाख ३६ हजार रुपये देतो. मागील वर्षी रोनाल्डिनोनं दोघींनाही एकाच वेळी लग्नाची मागणी घातली होती. दोघींनीही त्याचा प्रस्ताव मान्य केला. येत्या ऑगस्ट महिन्यात रोनाल्डिनो या दोघींनाही वरमाला घालणार आहे.

LEAVE A REPLY

*