8 हजाराची लाच घेतांना अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून अटकेत

2
अमळनेर : प्रतिनिधी : येथील प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्री.राजेंद्र आधार वाडे,वय-50 (वर्ग-3)रा-आंबेडकर नगर,चोपड़ा,जि.जळगाव यांना तक्रारदाराचे जात प्रमाणपत्र काढून देण्याच्या मोबदल्यात ८ हजार रूपयांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

हि कार्यवाही आज दि १०ला सकाळी साडे अकराच्या सुमारास प्रांत कार्यालयात करण्यात आली. यातील तक्रारदार यांच्या मुलाचे जातीचे प्रमाणपत्र काढुन देण्याच्या मोबदल्यात राजेंद्र वाडे यांनी तक्रारदार यांचेकडून पंचा समक्ष ८ हजार रू लाचेची मागणी केली,.म्हणुन ला.लु.प्र.का.कलम-७ व १५ अन्वये अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकातील लाच लूचपत विभागाच्या पो. नि. निता कायटे यांचे फिर्यादि वरून पो स्टे ला गून्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे

2 प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

*