शासकीय कार्यालयात हेल्मेट, सिटबेल्ट सक्ती

0
जळगाव | प्रतिनिधी :  वाढलेले अपघात लक्षात घेता. जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्ती व चारचाकी वाहन चालकांना सिटबेल्ट सक्तीचे आदेश काढले आहे.

शहरासह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सिटबेल्ट व हेल्मेट घातल्याशिवाय कार्यालयात प्रवेश करता येणार नाही. तसेच नागरिकांना देखील हेल्मेटविना कार्यालयात येता येणार नसल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या स्वाक्षरीचे पत्र कार्यालयांना देण्यात आले आहे.

शासकीय कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी कार्यालयात वाहनासह येतांना हेल्मेट व सिटबेल्टचा वापर केला नसल्यास त्यांना कार्यालयात प्रवेश करता येणार नाही.

या नियमांची माहिती होण्याकरीता कार्यालयाच्या प्रवेशाद्वाराजवळच जनजागृतीपर फलक लावण्याचेही सूचना देण्यात आले आहे. हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणार्‍यांविरुद्ध पोलीस विभागाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात असल्याचेही पत्रात नमूद आहे.

LEAVE A REPLY

*