शांततेमुळे गावाची प्रगती होते : पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराड

0

पारोळा | श.प्र. :  आपले गाव शहर जर गुन्हेगारीपासून लांब राहिले व शांतताप्रिय असले तरच गावाची प्रगती होते. व बेरोजगारी कमी होते व शहरात नवीन नवीन उद्योगधंदे उभे राहतात म्हणून गाव नेहमी शांततेत ठेवावे असे आवाहन पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराडे यांनी पारोळा येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

रमजान निमित्त पारोळा येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी पोलिस अधिक्षक दत्तात्रय फराडे, पोलिस निरिक्षक एकनाथ पडाळे, उपपोलिस निरीक्षक जितेंद्र खैरनार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरिक्षक यांनी केले. एकोपाने सर्व मिळून गाव शांतताप्रिय घडवू असे सांगितले.

या कार्यक्रमाला नगरसेवक दिपक अनुष्ठान, सुधाकर पाटील, संजय पाटील, मनिष पाटील, राजेंद्र पायील, गौरव बडगुजर, जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, ऍड.कृतीका आफ्रे, पो.पा.संघटनेचे अध्यक्ष दिनकर पाटील, रशिदखान लोहार, समशेउद्दीन, विनोद खाडे, नायब तहसिलदार वंजारी, सुनंदा वाणी आदी उपस्थित होते.

यावेळी पोलिस अदिक्षक पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांत एक पोलिस आहे व प्रत्येक पोलिसात एक नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला समजून घ्या व गावात शांतता कशी राहील या उद्देशाने सहकार्य करा.

गावाला बदनामीचा डाग लागू नये म्हणून गाव शांत ठेवावे तसेच पारोळा पोलिस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी आहे ती पुढील महिन्यात नक्की वाढवून देण्याची ग्वाही दिली व येणारे सर्व धार्मिक कार्यक्रम गालबोट न लावता आनंदाने साजरे करण्याचे आवाहन केले.

शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिस पाटील दक्षता समिती व विविध राजकिय पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिस प्रताप पाटील, पंकज राठोड, पंढरी पवार, बाळकृष्ण शिंदे, भगवान साळुंखे आदि पोलिसांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी मानले.

पोलीस संख्या वाढणार

पारोळा पोलीस ठाण्याला १९६० पासून पोलीस कर्मचार्‍यांची अत्यंत कमी संख्या आहे. तालुक्याचा वाढता विस्तार व वाढत्या घटनांचा विचार करता शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी येथे पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी केली असता जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.कराडे यांनी मागणी रास्त असल्याचे सांगत याठिकाणी पोलीस संख्या वाढवून दिली जाईल असे आश्‍वासन यावेळी दिले.

LEAVE A REPLY

*