डोणगावरोडवरील चारचाकीतील पोलिस पुत्र रोमीयोची दादागीरी : शालेय विद्यार्थ्यांस मारहाण

0

उंटावद, ता. यावल |  वर्ताहर:  डोणगाव कडुन मनुदेवी कडे जाणा-या रस्त्यावर भावीकांची नेहमीच वरदळ असते. त्यातच रोमीयो देखील मजा मारण्यासाठी मनुदेवीला जातात. त्यांचा भावीकांना त्रास होत असतो. मात्र कोणीही त्यांना हाटकण्याचा प्रयत्न करत नाही.

कारण तरूण- तरूणी गृपकरूनच मनुदेवीच्या दर्शनाच्या निमीत्त साधुन आलेले असतात. रस्त्याने ंअशल्लील चाळे करतांना ब-याच लोकांना दिसतात तसेच रस्त्याने जातांना शिटी वाजवणे जोराणे आरोळ्या मारणे असे बरेच प्रकार रस्त्याने घडतात.

त्याकडे कोणी लक्ष दिले तर आम्ही पोलिसपुत्र आहोत, वडील एसपी ऑफिसला आहेत. काहीच होणार नाही असा दम ते विरोध करणार्‍यास भरत असतात. त्यातही कोणी प्रयत्न केला तर या पोलिसपुत्रांसोबत आलेल्या तरूणी सबंधिताने विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्याची धमकी देत असतात. त्यामुळे कोणीच अशा सैराट मजनुंना विरोध करत नाही. परिणामी अशा पोलिस पुत्रांच्या प्रेमलिला या सैराट होत आहेत.

यांना प्रतिबंध कोण घालणार असा यक्ष प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण जळगावला क्रीडा पोलिस उपनिरीक्षकाने व त्याच्या पोलिस पुत्राने विद्यार्थीनीवर केलेल्या अन्यायाचा भांडाभोड सदर अन्यायग्रस्त युवतीने केला आहे. हा भांडाफोड होताच उपनिरीक्षक व त्याचा पोलिस असलेला मुलगा हे दोघेही फरार झाले आहेत.

शाळकरी मुलाला मारहाण

दि.२१ रोजी दुपारी १.३० वाजता मनुदेवीकडुन येणा-या एमएच १९ एई ३९५० या गाडीत २ मुले व ५ मुली होत्या. तर चिंचोली विद्यालयातील डोणगाव येथील इयत्ता ९ वी चा विद्यार्थी गणेश जितेंन्द्र पाटील हा डोणगावकडे पायी येण्यासाठी रस्त्यावरून चालत जात होता.

त्याने गाडीत बसलेल्या मुलींना अश्लिल बोलला असे गाडीतल्या तरूण -तरूणींना वाटले. मात्र वातानुकुलीन गाडीचे चारही काच बंद असतांना त्यांना त्याचा आवाज कसा ऐकु गेला हे अनाकलनीय आहे. मुलींना अश्‍लिल बोलल्याचा गैरसमज करून घेत गाडीतुन दोघे तरूण खाली उतरले व त्यांनी त्या विद्यार्थ्याला मारहाण कली.

मारहाण करून ते गाडीत बसुन मार्गस्त होत डोणगाव गावाच्या बाहेर रस्त्यावरील धाब्यावर जेवणासाठी थांबले. त्यांच्या पाठोपाठ त्या विद्यार्थ्यालाही ट्र्ँक्टर भेटले व तो घरी (डोणगावला ) जातांना ते तरूण व तरूणी त्याला रस्त्याच्या बाजुला जेवणाला बसलेले दिसले.

त्या विद्यार्थ्याने घरी जाऊन आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगीतला व त्यांना सोबत घेऊन त्या तरूणांच्या जवळ आला. तेथे जवळपास अर्धा ते पाऊन तास भर रस्त्यावर जोरदार भांडण झाले.

माझे वडील एसपी ऑफिसला

मात्र गाडी चालवणारा तरूण चुक असुन देखील पोलीस कर्मचार्‍याचा पुत्र असल्याचे सांगत माझे वडील एस,पी.कार्यालयात आहेत. मी कोणाला घाबरत नाही असे सांगत गावातील लोकांना धमकावत होता .आजुबाजुच्या शेतात काम करणारे शेतकरीही त्या तरूणांना समजावत होते. बघता बघता डोणगाव मनुदेवी रस्त्यावर ट्राफीक जाम झाली.

..अन पोलिस नावाची पाटी लपवीली

गाडीजवळ दै.देशदुतचे उंटावद येथील पत्रकार आल्याचे समजताच गाडीतील तरूणांनी गाडीला लावलेली पोलिस नावाची लाल अक्षरातील पाटी लपवण्याचा प्रयत्न केला.

मात्र पत्रकार व काही नागरीकांनी मध्यस्ती करत भांडण मोडले.त्या दरम्यान ज्या गणेशला तरूणांनी मारहाण केली होती त्याला उपस्थीतांनी त्या तरूणांना मारण्यास सांगीतले मात्र गणेशने सांगीतले की ते माझ्यापेक्षा मोठे आहेत मी त्यांच्यावर हात उचलणार नाही.असे सांगत मोठेपणा दाखवला.

मनुदेवी परिसराचे पावित्र्य धोक्यात

डोणगाव कडुन मनुदेवीकडे जाणार्‍या रस्त्यावर असे प्रकार सर्रास होत असुन मात्र आतातर हे सैराटच झाले आहेत. यावर प्रतिबंध कोण घालणार.कारण सैराट झालेले हे पोलिस पुत्र असल्याने पोलिस आपल्या सहकार्‍यास वाचवितात. त्यामुळे परीसरातील नागरीकांना याचा त्रास नेहमीच सहन करावा लागत आहे.

पोलिसांची होतेय विनाकारण बदनामी

आता तर या सैराटांनी पोलीस या नावाची पाटी गाडीला लाऊन जणू काही पोलीस कर्मचार्‍याचीच फॅमीली गाडीत प्रवास करत आहे असे भासवत आपल्याला कोणीही काहीही विचारणार नाही असे समजत आहेत.

या प्रकारामुळे पोलिसांची आणि पोलिस अधिक्षक कार्यालयाची मात्र विना बदनामी होत आहे. पोलीस नावाचा गैरफायदा घेऊन या तरूणांनी गरीब विद्यार्थ्यावर केलेली दादागीरी पहाता या सैराटांची चांगलीच हिंम्मत वाढली असुन त्यांचा बदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*