Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

भुसावळ गारठले :@15

Share

भुसावळ । प्रतिनिधी   शहरासह परिसरा आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढत असून थंडीचा पारा 15अंशावर आल्याने परिसर गारठला आहे. आठवडाभरात थंडीचा पारा तीन अंशांनी कमी झाला आहे. किमान तापमानासह कमाल तापमानातही 4 अंशाने घट झाली आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. तसेच बाजारात थंडी पासून संरक्षण करणार्‍या कपड्यांची आवकही वाढली आहे.

थंडीचा मागील आठवडाभराचा अंदाज पाहता दि.25 नोव्हेंबर रोजी शहराचे कमाल तापमान 34.2 तर किमान 17.9 इतके होते. ते दि. 2 डिसेंबर रोजी कमाल 30.9 तर किमान 15.2 अंशापर्यंत घटले आहे. कमाल व किमान तपामानात निम्मेची घट जणावत आहे. दिवसेंदिवस थंडीचा तडाखा वाढत आसल्याने परिसरातील नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होत आहे. वातावरणात सायंकाळी 6 वाजेपासून तर सकाळी 10 वाजेपर्यंत गारवा जाणवत आहे.

उबदार कपडे दाखल

आठवडाभरात तापमानात झालेली मोठी घट पाहात अगामी काही दिवसात थंडी अजून जोर पकडण्याची चिन्हे दिसत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत तसेच कपड्यांच्या दुकनात स्वेटर, हात मोजे व पायमोजे यांच्यासह ब्लँकेट, शाल, मफलर, महिलांचे स्कार्प बाजारात उपलब्ध झाले आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी परप्रांतीय बांधवांकडून थंडीपासून संरक्षण देणार्‍या कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहे.

हॉट सिटी कुल

दरम्यान, उन्हाळ्यात 45 ते 49अंशापर्यंत तापमाण राहणार्‍या भुसावळ शहराचे तापमाण आठवडाभरात 15 अंशांवर येवून ठेपल्याने हॉट सिटी आत कुल झाल्याचे जाणवत आहे.

शेकोट्या पेटल्या

थंडी पासून संरक्षण मिळविण्यासाठी शहरासह ग्रामिण भागात शेकोट्या पेटवून थंडीपासून स्वत:चे करण्यात येत आहे.

मॉर्निक वॉक सुरु

हिवाळा सुरु झाल्याने शहरातील जामनेर रोड, आरपीडी रोड, यावल रोड, जळगाव रोड,वरणगाव रोड भागात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक बाहेर पडत आहेत तर काहीनीं जीममध्ये व्यायामाचा सराव सुरु केल्याचे दिसून येत आहे.

आठवडाभरातील तापमान

दिनांक               कमाल किमान
25 नोव्हेंबर          34.2 17.9
26 नोव्हेंबर         34.3 16.3
27 नोव्हेंबर         33.3 16.0
28 नोव्हेंबर         32.8 16.6
29 नोव्हेंबर         32.8 16.3
30 नोव्हेंबर        32.9 15.4
1 डिसेंबर           33.3 16.2
2 डिसेंबर          30.9 15.2

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!