रावेर तालुक्यात होणार पाच लाख वृृक्षांची लागवड

0
रावेर | प्रतिनिधी:   जागतिक तापमानवाढ लक्षात घेता वृक्ष संवार्धना शिवाय पर्याय नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षापासून मुख्यमंत्री ना.देवेंद्र ङ्गडणवीस आणि वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वनमहोत्सवास सुरवात करण्यात आली.

मागील वर्षात १ जुलै २०१६ या दिवशी वन विभागाकडून सातपुडा पर्वत रांगांमध्ये एकाच दिवशी २ लक्ष १६ हजार वृक्ष लागवड करण्यात आ ली असून इतर शासकीय कार्यालये, शाळा यांनी देखील ३५ हजार झाडे लावली होती. यावर्षी शासनाने वनमहोत्सव १ ते ७ जुलै २०१७ सप्ताह राबविण्याचे ठरविले असून यात एकच लक्ष, चार कोटी वृक्ष या मोहिमेत रावेर तालुक्यात वृक्ष लागवड पूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असून वन विभागाकडे सहा गावातील नऊ ठिकाणी असलेल्या रोपवाटिकेत ३ लक्ष ५५ हजार ८०० रोपे लागवडी योग्य तयार करण्यात आले आहेत.

२३ गावांमधून पेसा अंतर्गत ४६५०० तर ९५ ग्रामपंचायती मधून ३८००० रोपे विकसित करण्यात आली आहेत. सदर मोहीम राबविण्यासाठी जळगांव जिल्ह्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणुन तर उपवनसंरक्षक संजय दहिवले हे समन्वयक म्हणुन काम बघत असुन रावेर तालुक्यात समिती अध्यक्ष म्हणुन प्रांत अधिकारी मनोज घोडे-पाटील तर सदस्य सचिव म्हणुन वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे तर तालुक्यातील सर्व अधिकारी सदस्य म्हणुन मोहीम राबविण्यासाठी तत्पर आहे.

गाव पातळीवर सरपंच अध्यक्ष असतील तर वनपाल सदस्य सचिव राहतील. वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने तीन बैठका झाल्या असुन सोळा गावांमध्ये गांव पातळीवर देखिल बैठका घेण्यात आलेल्या आहेत.

पाल येथील वृक्ष दिंडीद्वारा जनजागृती मोहीमेस सुरुवात करण्यात आली व शाळा महाविद्यालय, आठवडे बाजार, बसस्थानक याठिकाणी देखिल वनकर्मचार्‍यांद्वारा समुपदेशन करण्यात येत आहे.

वृक्ष लागवडीसाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदांडा, श्रीराम फाउंडेशन, माऊली फाउंडेशन, अंबिका व्यायामशाळा यांच्या सह खाजगी शाळा, होमगार्ड पथक व इतर सेवाभावी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी होणार असुन शासनाच्या ग्रीन आर्मी या ऑनलाईन नोंदणी करणार्‍या संस्था व व्यक्ती यांनाच रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील.

तरी नागरीकांनी नोंदनी करवुन घ्यावी. सावदा येथे रोपे आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत असुन शेतकर्‍यांना व नागरीकांना त्या ठिकाणी अत्यल्प दर आकारुन रोपे घेता येतील असेही आवाहन वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांनी केली असुन पत्रकार परिषदेत सहा. वनसंरक्षक व्ही. एच. पवार, यावल वनक्षेत्र पाल एम. डी. राऊत  आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*