सहा विभागांचा वीजपुरवठा दोन दिवस बंद!

0
जळगाव । जिल्ह्यातील विज वितरणच्या उपकेंद्रांवर दि.18 व 19 रोजी दोन दिवस तांत्रिक देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. त्यामुळे धरणगाव, सावदा, भुसावळ, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगांव या सहा विभागातील वीज पुरवठा चार ते आठ तास बंद राहणार आहे.

धरणगाव विभाग दि.18 रोजी 33/11 केव्ही लासुर उपकेंद्रातुन निघणार्‍या सर्व 11 केव्ही वाहिन्या सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत बंद राहतील. दि. 19रोजी धरणगांव विभाग 33/11 केव्ही किनोद उपकेंद्रातुन 11 केव्ही वाहिन्या सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत बंद राहतील. आणि 33/11 केव्ही हातेड उपकेंद्रातील 11 केव्ही वाहिन्या सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत बंद राहतील. सावदा विभागात 132 केव्ही निंभोरा उपकेंद्रत विवरा-3

शेती, विवरा 2+1 शेती, आंदलवाडी सिंगल फेज, खिर्डी शेती, बलवाडी शेती, निंभोरा गावठाण व सिंगत शेती या वाहिन्या, 33/11 केव्ही निंबोल उपकेंद्रातील सांगवा शेती, नांदुर्खेडा शेती, निंबोल गावठाण, सांगवा गावठाण, पातोंडी शेती, 33/11 केव्ही विवरा उपकेंद्रातील विवरा-1 शेती, विवरा-2 शेती, विवरा-3 शेती, विवरा गावठाण, उटखेडा गावठाण, कुसुंबा शेती व 33/11 केव्ही ऐनपूर उपकेंद्रातील भामलवाडी शेती, कांडवेल शेती, विटवा शेती, ऐनपूर शेती, धामोडी सिंगल फेज, ऐनपूर गावठाण,खिर्डी गावठाण येथील वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत बंद राहील.

तसेच 132 केव्ही विरोदा यावल या अति उच्चदाब वाहिनीवर अतिमहत्वाचे काम करावयाचे असल्यामुळे 132 केव्ही यावल उपकेंद्रातून निर्गमित होणारी 11 केव्ही अट्रावल शेती वाहिनी, 33/11 केव्ही राजोरा उपकेंद्रातील राजोरा गावठाण, राजोरा शेती, अंजाळे गावठाण, अंजाळे शेती, पिंप्री सिंगल फेज या सर्व वाहिन्यांवरून होणारा वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत बंद राहील. पाचोरा विभाग -33 के.

व्ही. शेंदुर्णी उपकेंद्रातील वडगाव शेतीपंप, लोहारा म्हसास शेतीपंप, कुर्‍हाड शेतीपंप, कुर्‍हाड गावठाण, अंबे वडगाव गावठाण, लोहारा म्हसास गावठाण, लासगाव, बांबरुड, नांद्रा, वरसाडे, बांबरुड शेतीपंप या वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत बंद राहील. 33 के. व्ही. लोहारा उपकेंद्रातील लोहारा शेतीपंप, लोहारा गावठाण, कळमसरा शेतीपंप या वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 5 या वेळेत बंद राहील. तसेच 11 के. व्ही. पारोळा शहर व झपटभवाणी या वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत बंद राहील. चाळीसगांव विभागात 33/11 केव्हीच्या वाहिन्या बंद राहतील. यात भोरस,

मेहुणबारे, दहीवद, केव्ही उंबरखेड, आडगाव पिलखोड, शिरसगाव, तळेगाव, गणेशपूर व पिंपळगाव, हातले, पिंपरखेड, सांगवी उपकेंद्रा अंतर्गत येणारी सर्व गावे व सभोतालचा शेती परिसर. 33/11 केव्ही उपकेद्र चाळीसगाव शहरातील घाट रोड, पाटील वाडा चौधरी वाडा, व जुन्या गावातील परिसर. तसेच 11 केव्ही खडकी वरील खडकी गाव, पाटखडकी व सभोतालचा शेतीचा परिसराचा वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत बंद राहील. भुसावळ विभागात 132 केव्ही पहूर उपकेंद्र येथुन निघणार्‍या 11 केव्ही वाकोद,

पहूर, गोंडेगाव, नाचनखेडा, पहूर एक्स्प्रेसचा वीजपुरवठा सकाळी9 ते सकाळी 11.30 या वेळेत बंद राहील. तर 33/11 केव्ही मालदाभाडी उपकेंद्रातील मालदाभाडी, वाघारी, वाडीकील्ला या वाहिन्यांचा वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत बंद राहील. मुक्ताईनगर विभागात 33 केव्ही तलवेल उपकेंद्रातुन सर्व 11 के.व्ही वीज वाहिन्यांचा ( तळवेल, पिंपळगांव, जुनोना, बेलखेडा, झरखेडा, दर्यापुर, मानपुर, काहुरखेडा, सिध्देश्वरनगर, जाडगांव, मन्यारखेडा या गांवाचा) वीज पुरवठा सकाळी 8ते दुपारी 1 या वेळेत बंद राहील.

LEAVE A REPLY

*