पाईपावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

0
जळगाव । शहरातील शिवाजी नगरमध्ये असलेल्या खुबचंद सागरमल शाळेच्या गच्चीवर गेलेला चेंडू काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाईपावरून तोल जावून पडल्याने तो गंभीर जखमी झाला.

मेंदुला जबर दुखापत झाल्याने तो कोमात गेला होता. विशाल कृष्णा दुधाने (वय 19) असे त्याचे नाव असून जिल्हा शासकीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना रात्री 11.25 वाजता त्याचा मृत्यू झाला.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नगरात खुबचंद सागरमल शाहा असून सध्या सुट्या असल्याने शाळा बंद आहे. दरम्यान दि.16 रोजी दुपारी परिसरातील काही तरुण याठिकाणी क्रिकेट खेळत होते. या परिसरात राहणारा विशाल हा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने घराच्या बाहेर बसला होता.

यावेळी त्याच्या आईने त्याला जेवण करून घे असे सांगितले. यावर त्याने लाईट आल्यावर जेवण करेल असे सांगितले. त्यावेळी क्रिकेट खेळणार्‍या तरुणाचा चेंडू शाळेच्या गच्चीवर गेला. या तरुणांनी चेंडू काढण्याचे विशालला सांगितले. विशाल चेंडू काढण्यासाठी शाळेच्या भिंतीलगत असलेल्या पाईपाला धरूनवर चढला.

खाली उतरत असतांना अचानक पाईपाजवळील खिळे निघाल्याने व पाईप हलका असल्याने पाईप तुटून विशाल खाली डोक्यावर पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खाली पडल्यानतंर त्यास लगेच परिसरातील मुलांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

त्याच्या मेंदुला जबर मार बसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले. उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने विशाल याला गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबियांसह मित्र रात्री उशिरापर्यंत तेथेच थांबून होते. रात्री 11.25 वाजता त्याचा मृत्यू झाला. विशाल हा महापालिका कर्मचारी कृष्ण दुधाने यांचा मुलगा आहे.

LEAVE A REPLY

*