प्रा.दीपक पटील खून प्रकरणात दोघांना अटक

0
अमळनेर । येथील प्रा.दीपक पाटील खून प्रकरणी पोलिसांनी कारंजा येथून कुख्यात राज चव्हाण याच्यासह दोघांना अटक केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या शहरात तपास केला. शेवटी तो कारंजा येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकला.प्रा. दीपक पाटील व सागर मराठे वय 25 यांची मैत्री होती राज वसंत चव्हाण वय 27 याच्या गैरहजेरीत राबिया दिलेखा पटवा वय 26 हिच्याशी सागर मराठेचे सूत जमले होते.

त्यामुळेच प्रा. दीपक पाटील यांचे देखील सागरच्या माध्यमातून राबिया च्या संपर्कात आले होते. संपवायचे होते सागरला, संपले प्रा.पाटील राबियाशी प्रेम संबंध जुळल्याची माहीती राज याला समजली होती, त्यामुळे तो चिडलेला होता. राज हा राबियाजवळ बसलेला असतांना योगायोगाने प्रा.दीपक पाटील यांचा फोन आल्याने राजला समजल्यावर त्याने दोघांना बोलवायला सांगितले.

त्यामुळे सागर मराठेसह प्रा.दीपक पाटील ला राज चव्हाणच्या घराजवळील तालुका क्रीडा संकुलाजवळ बोलाविले. यावेळी राज समोर दिसताच सागरने पळ काढला. यावेळी राजसोबत असलेल्या गणेश उर्फ विजय रा.बदलापूर मुंबई यांनी मिळून संकुलाच्या ग्राउंडमध्ये नेऊन दांडक्याने डोक्यावर व पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केली व त्यानंतर या दोघांनी डॉ. हजारे यांच्या हॉस्पिटलजवळ आणून सोडले व पुढे

प्रा. पाटील यांच्या एटीएम कार्ड द्वारे गणेश उर्फ विजय याने पैसे काढले. तो पर्यंत राजने राबियाला म्हाडा वसाहतीत सोडले अन् गाडी तेथे फेकून दिली. त्यानंतर दोघे घरी येऊन झोपले दुसर्‍या दिवशी दुपारी 2 वाजता धरणगाव, पाचोरा,मुंबई, शिर्डी, औरंगाबाद व्हाया वाशीम पुन्हा सुरतला राबियाचा चुलत भाऊ अजिजच्या संपर्कात येऊन त्याच्याकडे राहीले. राजने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल

अजीज ला दिला अन अजीज राजू नावाच्या इसम विकला दरम्यान संबंधित मोबाईल पोलिसांनी इएमआयनं लोकेशन ट्रेस केले असता सुरत ला आढळले अजीज याची माहीती मिळाली असता अजीजला चौकशीकामी ताब्यात घेऊन अमळनेरला आणले व त्याला पोलिस स्थानकात थांबवले. दरम्यान यावेळी एके दिवशी राजने अजीजला फोन केले असता काही वेळ संभाषण झाले. त्यात कारंजा येथील लोकेशन

पोलिसांना समजले होते. दरम्यान फोन बंद करून ठेवल्यामुळे त्याचा ठिकाण समजत नसल्यामुळे पोलिस गोंधळात होते. पुन्हा बुधवारी दीड वाजता अजीजला राजचा फोन आल्याने पोलिस सतर्क झाले व तत्काळ अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या सुचनेने पथक कारंजा येथे रवाना झाले.

आणि वाशीम जिल्यातील कारंजा शहरातील तुळजाभवानी नगर झोपडपट्टी परिसरातून बुधवारी मध्यरात्री अमळनेर पोलिसांनी कारंजा शहर पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाईलने ताब्यात घेतले.

दरम्यान या प्रकरणातील सागर मराठे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे अजून काही संशयित या प्रकरणी चौकशी कामी बोलाविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*