भादली हत्त्याकांड : दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

0
जळगाव । तालुक्यातील भादली येथे मागील वर्षी एकाच रात्री भोळे कुटुंबातील चौघांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

दरम्यान वैज्ञानिक अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून रमेश भोळे व प्रदिप उर्फे बाळू खडसे (रा.भादली) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भादली येथे दि.20 मार्च 2017 च्या रात्री प्रदीप भोळे, त्याची पत्नी व दोन्ही मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली. या खुनाच्या घटनेला वर्ष होवून देखील या चौघांची नेमक्या कोणत्या कारणावरून हत्या करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही. या घटनेप्रकरणी भुसावळ विभागाचे डीवायएसपी तथा आयएस अधिकारी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिराबाद पोलिस स्टेशनचे सपोनि आर.टी.धारबळे वेगवेगळया पैलुंनी तपास करीत आहेत.

दरम्यान मागील महिन्यात या खुनाच्या गुन्ह्यात संशयित 6 जणांनी प्रॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली होती. तसेच या संशयितांची बे्रन मॉपिंग टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून ब्रेन मॉपिंग टेस्टला अद्याप न्यायालयाने परवानगी दिलेली नाही.

दरम्यान यातील 5 जणांच्या प्रॉलीग्राफ टेस्टचा वैज्ञानिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या अहवालावरून व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पोलिसांनी रमेश भोळे व प्रदिप उर्फ बाळू खडसे या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे लवकरच या गुन्हाचा उलगडा होवून चौघांच्या हत्येचे कारण समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*