तांबोळे येथे दरोडा; वृद्ध दाम्पत्याला मारहाण

0
चाळीसगाव । तालुक्यातील तांबाळे येथे शेत शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या वृद्ध दांपत्यालाज जबर मारहाण करत, अज्ञात दोन दारोडेखोरांनी 75 वर्षीय वृध्देच्या अंगवारील दागिने ओरबडले, तर 90 वर्षीय वृध्दांचा खिशातील पैसे बळजबरीने काढुन, एकूण 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोड्याखोरांनी पोबारा केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

वनाबाई रंगराव बच्छे(75) व त्यांचे पती रंगराव घोगरराव बच्छे(90) रा.पोहरे,ह.मु.तांबोळे हे काही दिवसांपूर्वीच मुलीच्या सासरी तांबोळे येथे आले होते. नेहमीप्रमाणे दि.17 तांबोळे शिवारातील सोमनाथ भुरा धनगर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेलेे असताना, अज्ञात दोन दरोडेखोरांना वृध्द दापंत्य एकटे असल्याची संधी साधत, मध्यरात्री त्यांना चापटा बुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण केली.

वनाबाई बच्छे यांना धमकावत, त्यांच्या अंगावरील 5 हजार रुपय किमतीचे सोन्याचे कुडूक, 12 हजार 500 रुपय किमतीचे सोन्याच्या बाळ्या व 4 हजार रुपय किमतीचे चाँदीचे कडे बळजबरीने ओरबडले. तसेच त्यांचे पती रंगराव यांच्या खिशातील रोख 3 हजार रुपय घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत वृध्द दांपत्याला डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ते सद्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. वनाबाई यांनी आराडा-वोरड केल्यानतंर आजुबाजूचे शेतकरी जमा झाले. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वनाबाई बच्छे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन दरोडेखोरांविरोधात भादवी कलम 392,394,452,34 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास एपीआय बोरसे करीत आहेत. वनाबाई यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार एक दरोडेखोर हा 20 ते 25 वयोगटातील तरुण गोरापान युवक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ग्रामीण भागात पोलिसांची ग्रस्त नसल्यामुुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

*