रावेर येथे कृषी विक्रेत्यांचे प्रशिक्षण शिबिर

0
रावेर, – येथील पंचायत समिती सभागृहात कृषी अधिकारी एस.एस.काळेल व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्यातील बी-बियाणे, कीटक नाशके व रासायनिक खते विक्रेत्यांचे खरीप हंगाम प्रशिक्षण व बोंड अळी नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर रावेर अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे, सचिव युवराज महाजन, खजिनदार डॉ.जी.एम. बोंडे, शहराध्यक्ष एकनाथ महाजन, कृषी विस्तार अधिकारी ढेरंगे, सी.टी. माळी आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात कृषी अधिकारी एस.एस.काळेल यांनी गुणवत्ता नियंत्रण, पीओएस मशीन व बी -बियाणे कायदा तसेच खत नियंत्रण कायदा याबाबत माहिती दिली. व जिल्ह्याबाहेरून खते अथवा बियाणे विक्री तसेच आणू नये याबाबत माहिती दिली.

रावेर अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे यांनी बियाणे उगम प्रमाणपत्र मिळत नसून यासाठी जिल्हास्तरावर संबंधित कंपनीकडून उपलब्ध केल्यानंतर विक्रेत्यांना परवानगी द्यावी तसेच राशी 659 ला विक्रीची परवानगी द्यावी जेणेकरून काळा बाजार बंद होईल व कीटक नाशकांचे नवीन प्रमाणपत्र कंपन्यांना उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले.

याबाबत प्रशासनाने दखल घेऊन तोडगा काढण्याची मागणी सुनील कोंडे यांनी केली. तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी कीटक नाशक हाताळणी, त्यांचे प्रिन्सिपल, बियाण्यांची विक्री व कायदे यांसह तपासणीबाबतचे नियम याबाबत माहिती दिली.

तसेच सर्व विक्रेत्यांची बोंड अळी नियंत्रणासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असून त्यासाठी आपापल्या गावात कृषी विभागास सहकार्य करावे असे आवाहन ही केले. यासाठी कापूस पिकांच्या अवस्था, बोंड अळीचा जीवनक्रम, त्यासाठी नियोजन तसेच कीटकनाशकांच्या हाताळणीसाठी सुरक्षा किट याबाबत श्री.पवार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सभेस तालुकभरातून संघटनेचे रावेर तालुका उपाध्यक्ष अश्विन पाटील, संघटनेचे सदस्य राजू महाजन, रवींद्र बारी यांसह विकास महाजन, सुनील कुलकर्णी, जितेंद्र पाटील, गणेश महाजन, पंकज बोरा, ओम अग्रवाल, प्रदिप महाजन, सुभाष चौधरी, एम.आर.पाटील, वामनराव पाटील यांसह मोठ्या प्रमाणावर कृषी विक्रेते प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*