पाटील दाम्पत्याचा समाजाने आर्दश घ्यावा! – माजी आ.रमेश चौधरी

0
यावल । लग्नाचा वाढदिवस साजरा करतांना वायफळ खर्च करण्या ऐवजी समाज व आपल्या गावा परिसराला त्यातुन लाभ होईल असा उपक्रम राबवणारे सौ. कल्पना व उमाकांत पाटील हे दाम्पत्याकडून समाजाने आर्दश घेतला पाहिजे मत माजी आमदार रमेश चौधरी यांनी व्यक्त केले.

पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत रामराव पाटील व सौ कल्पना पाटील यांचा गुरूवारी (दि.17) लग्नाचा 31 व्वा वाढदिवस होता तेव्हा हा वाढ दिवस थेट सातपुड्यातुन वाहुन येणार्‍या लव्हाड या नाल्यात त्यांनी साजरा केला दरवर्षी या नाल्याला पुर येतो व संपुर्ण पाणी वाहून जातं तेव्हा लग्नाच्या वाढदिवसावर वायफळ खर्च न करता त्यांनी या नाल्या मंडप लावुन कार्यक्रम घेतला

त्यात नाल्याचे पुजन करून चार ट्रक्टरच्या साह्याने तब्बल एक किमी अंतरावर आडवी नागरणी केली या नागरणीतुन नाल्यात बंडींग तयार झाल्या आहेत त्यामुळे एक किमी अंतराचे पाणी सरळ वाहून न जाता ते ठिक-ठिकाणी आडवले जाईल व भुगर्भात मुरेल व भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूअप्पा पाटील,

माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर. जी. पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या अरूणाताई पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, पंचायत समितीचे गटनेता दिपक पाटील, शेखर पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, विस्तार अधिकारी एस.टी. मोरे, चंद्रकांत चौधरी, डॉ. योगेश पालवे, प्रमोद पाटील, कैलास वराडे, विनय पाटील, प्रफुल्ल पाटील, रफीक तडवी सह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन. आर. पाटील यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.

उत्सवा ऐवजी पाणी अडवण्यावर खर्च करा.
दुर्गोत्सव, गणेशोत्सव सह विविध उत्सवात वायफळ खर्च टाळून पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमावर खर्च केला गेला पाहिजे. तरूणांनी भविष्याच्या दृष्टीने भुगर्भातील जलपातळी वाढवण्याचे व्हिजन हाती घ्यावे असे प्रसंगी शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूअप्पा पाटील यांनी व्यक्त केले.

4 ट्रक्टर एक किमी आडवी नागरणी
या कार्यक्रमात चार ट्रक्टरव्दारे सुमारे तीन तास नाल्यात काम करण्यात आले त्यात खोलवर आडवी नागरणी करून बंडींग टाकण्यात आल्या आहे. या कार्यक्रमातील उपक्रमात किनगाव गावातील शेकडोच्या संख्येत शेतकरी व नागरीकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*