साहेबराव काळे यांना रंगकर्मी पुरस्कार

0
चाळीसगाव, । सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कारांचे नुकतेच भोसरी पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात वितरण करण्यात आले. यात चाळीसगावचे कलावंत साहेबराव काळे यांना रंगकर्मी पुरस्काराने राज्याचे कामगार मंत्री ना.संभाजीराव निलंगेकर पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पुणे येथील आमदार महेश लांडगे सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार, लायन्सक्लबचे प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, विक्रम गोजमगुंडे, सदानंद पिलाणे अमित, नगरसेविका प्रियांका बारसे, शैलेश गोजमगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारार्थी म्हणून सिनेनाट्य क्षेत्रातील नावाजलेले कलाकार अशोक शिंदे, ख्वाडा, व बबन, चित्रपटाचे अभिनेते भाऊसाहेब शिंदे, सिरीयल कलावंत, व नाट्यलेखक, अशोक समेळ शेखर फडके, योगेश सोमण,स्वास चित्रपटाचे अभिनेते अरुण नलावडे मराठी अभिनेत्री तथा सेनस्सार बोर्ड सदस्या मैथिली जावकर, लावणी कलावंत

स्मिता पाटील, या कलाकारांना रंगकर्मी पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले, याच वेळी चाळीसगाव येथील कलाकार यश (साहेबराव) काळे यांनाही कलाक्षेत्रातील कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे व कुलकर्णी मॅडम यांनी केले. यावेळी मोठया संख्येने कलाक्षेत्रातील मान्यवर व रसीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*