कजगावात दुसर्‍या दिवशीही चोरीचा प्रयत्न

0
भडगाव । तालुकयातील कजगाव येथील डॉ सुधीर पाटील यांच्या घरात चोरीच्या प्रयत्नाला 24 तास उलटत नाही तोवर जून्या गावातील एका घरात शस्त्राचा दाखवत पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्नची घटना दि.16 रोजी रात्री दोन वाजता घडली. दरम्यान चोरट्यांनी एका जणाला मारहाण देखील केली असून यामुळे कजगाव येथे घबराट पसरली आहे.

कजगाव येथील जून्या गावातील रहिवासी रमेश विश्वनाथ पाटील हे लहान मुलासह आपल्या शेताला लागून असलेल्या घराच्या बाहेर खाटेवर झोपले असताना शेताच्या दिशेकडून येऊन चार-पाच चोरट्यांनी त्यांना धारेदार शस्त्राचा धाक दाखवून जागेवरून उठू नको, नाहीतर मारून टाकू असा दम देऊन आवाज करू नको

तसेच घरातील चावी दे, असे सांगितले. परंतु चाबी नाही म्हणून सांगितले असता दोन जणांनी घराचा दरवाजा उघडला. यावेळी घरात झोपलेला भूषण याला देखील त्या दोन तीन जणांनी जिवे मारण्याची धमकी देत त्याचा हात मुरगडून जमिनीकडे तोंड दाबून धरले. यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त करीत गोदरेज

कपाट टॉमीच्या साहाय्याने उघडल्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नात घमेलाचा आवाज झाल्याने पुढच्या खोलीत झोपलेले एका महीलेला जाग आली असता त्या चोरट्यांनी तेथून पळ काढला. यावेळी रमेश पाटील हे जोराने किंचाळून उठले, तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या गुडघ्यावर जोरदार टॉमीचा हल्ला केला, यात ते जखमी झाले आहेत.

चोरट्यांची भाषा अहिराणी – रमेश पाटील यांना शस्त्र चा धाक दाखवत चोरीच्या उद्देशाने आलेल्या त्या चोरट्यांनी एकमेकांशी बोलताना अहिराणी भाषेचा वापर करीत होते. तसेच ते 23 व 25 वयोगटातील असतील असे रमेश पाटील यांनी सांगितले. चोर हे गाव परिसरातील असण्याची शक्यता आहे.

कजगावात गेल्या अनेक दिवसांपासून अनोळखी लोकांचा वावर वाढला असून येथे नवीन रहीवाशी आलेल्या व्यक्तींचा पोलीसांनी ओळख परेड केली पाहीजे अशी मागणी होत आहे. गेल्या काळात परराज्यातील लोखंडपासून वस्तू तयार करणारे एक कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून येथे रहीवास म्हणून आलेले होते.

त्यांचा गावात बर्‍याबाकी ओळख देखील झाली होती परंतु याच कुटूंबातील एका सदस्याला एका चोरीच्या गुन्हात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडले होते. याबाबत गावात माहीती झाली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता तरी पोलीस प्रशासनाचे या दिशेने तपास केला पाहिजे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*