शेताच्या मालकीचा वाद; दोघांना मारहाण

0
चोपडा । शेताच्या मालकी हक्काच्या वादावरून बाचाबाची होऊन शेतमालकास व साक्षीदारास शिवीगाळ व दमदाटी करून धक्काबुक्की करत जिवेठार मारण्याची धमकी देत चापटा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या अंगातील शर्ट फाडून टाकल्याची घटना आज सकाळी 9:30 वाजता विरवाडे शिवारात घडली. याबाबत पाच जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण राधेश्याम जैस्वाल रा.तेलीवाडा चोपडा हे त्यांच्या विरवाडे शिवारातील मालकीच्या गट नंबर 259 मध्ये ट्रॅक्टरने नांगरट करीत असतांना बन्सीलाल हरसिंग पाटील,भारत बन्सीलाल पाटील, अशोक ओंकार पाटील, प्रविण उर्फ पिंटू बन्सीलाल पाटील व भुरा ओंकार पाटील सर्व रा.विरवाडे यांनी गट नंबर 259 मध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून तुम्ही केलेली शेताची खरेदी खोटी कागदपत्रे सादर करून केलेली असल्याचा आरोप केला,

त्यावर फिर्यादी प्रविण जैस्वाल यांनी शेत तुमच्या मालकीचे असल्यास कागदपत्रे दाखवा असे सांगितल्याचा राग आल्याने पाचही जणांनी फिर्यादी यांच्या शेतात गैरकायद्याने मंडळी जमा करून शेतमालक प्रविण जैस्वाल व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ व दमदाटी करून जिवेठार मरण्याची धमकी देत धक्काबुक्की करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच जैस्वाल यांच्या अंगातला शर्ट फाडून टाकला.

विशेष म्हणजे गट नंबर 259 संदर्भात कोर्टाने शेताचा कायदेशीर ताबा दिल्याचा आदेश दिला असतांना देखील कोर्टाचा आदेश मान्य न करता न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केली आहे. याबाबत शेतमालक प्रविण राधेश्याम जैस्वाल ( वय-45 ) धंदा-शेती रा.तेलीवाडा चोपडा यांच्या फिर्यादीवरून बन्सीलाल हरसिंग पाटील, भारत बन्सीलाल पाटील, अशोक ओंकार पाटील,

प्रविण उर्फ पिंटू बन्सीलाल पाटील व भुरा ओंकार पाटील सर्व रा.विरवाडे यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं.71 /2018 भादवि कलम 143 ,447 ,323 ,504 ,506 ,427 ,188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ. सुनील पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*