पारोळा येथे ढेप दुकानाला आग

0
पारोळा । शहरात कजगाव रोडवरील ढेपच्या दुकानाला अचानक आग लागल्याने त्यात तीन लाखाचे नुकसान झाले आहे
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील कजगाव रोडवरील गजानन हॉस्पिटल समोरील श्री जोंगेश्वरी ट्रेंडर्स पांडुरंग सीताराम मालपुरे यांच्या मालकीचे दुकानात आज अचानक आग लागली

त्यात ढेपची 200पोती जळून खाक झाले आहे. त्यामुळे दुकानाचे देखील भरपूर नुकसान झाले यावेळी घटनास्थळी नगरपालिकेचा अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. प्रचंड धुरळामुळे आग नेमकी कुठे लागली आहे हे लवकर कळू शकले नाही

त्यामुळे ढेपचे जास्त नुकसान झाले यात एकूण तीन लाखाचे नुकसान झाले आहे दोन आगीचे बंब लागले यावेळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार अग्निशामक चालक मनोज पाटील व परिसरात नागरिकांनी आग विजवण्यास मदत केली. यावेळी पो स्टे ला उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

*