रिक्षातून पडून विवाहिता ठार

0
यावल । भोवळ आल्याने धावत्या अ‍ॅपेरिक्षात खाली पडून 38 वर्षीय एक महिला जागीच ठार झाल्याची घटना दि.17 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोळवद रस्त्यावर घडली.

मिळालेली माहिती अशी की,आरेफा रसुल तडवी (वय38, रा.कोळवद, ह.मु. तडवी कॉलनी, यावल) या आपल्या कुटुंबियांसोबत कोळवद येथून गिरडगाव येथील नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या दुपारी कोळवद येथील शेखर भागवत सपकाळे याच्या अ‍ॅपेरिक्षा क्र.एम.एच.19 व्ही. 7038 मधून आपल्या गावी परतीसाठी निघाल्या होत्या.

यावल-कोळवद रस्त्यावर धावत्या रिक्षात आरेफा यांना भोवळ येवून त्या रस्त्यावर कोसळल्या.त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रिक्षाचालक व नातेवाईकांनी यावल येथील ग्रामीण रूगणालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक सुनीता कोळपकर यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट दिली.तडवी समाज बांधवांनी रूग्णालयात गर्दी केली होती.आरेफा यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.आरेफा यांच्या पश्चात पती,दोन मुले असा परिवार आहे. रात्री उशीरापर्यंंंत यावल पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. तपास यावल पाोपोलिस करित आहे.

LEAVE A REPLY

*