सद्गुरु बैठकीतून परोपकाराचा संदेश!

0
कळमसरे, ता.अमळनेर । वार्ताहर – सर्वत्र मानवतावादी दृष्टिकोन हा खालावत चालला आहे. अशा परिस्थितीत विचारांचा र्‍हास होत असताना महाराष्ट्राच्या जडणघडणीत धार्मिकता जोपासत समाजकार्याची शिकवण, परोपकार जोपासण्याचे ज्ञान समर्थ सद्गुरु बैठकीतून मिळत असून समाज मूल्य धोरणाचा विचार महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यानी दिल्याने समाजात संस्कार घडलेले दिसत आहेत.

या शिकवनीतून धार्मिकतेत कुठलीही अंधश्रद्धा नसून समाज कार्याची शिकवण व संस्कार शिकायला मिळत असल्याने नानासाहेबांचे कार्य नैतिक मुल्यांची शिकवण देणारी असल्याचे प्रतिपादन अमळनेर येथील विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यानी जानवे (ता.अमळनेर) ग्रामपंचायत कार्यालयात नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा अनावरणच्या कार्यक्रम प्रसंगी केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जानवे येथील सरपंच विजय सोनवणे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.व्ही.आर.पाटील, पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भील, आटाळे येथील सरपंच प्रकाश पाटील, संदीप पाटील, कैलास खैरनार, अधिकार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विजय सोनवणे, आमदार स्मिता वाघ, पं. स. सभापती वजाबाई भील आदी प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा अनावरण करण्यात आले. तहसीलदार प्रदीप पाटील, अनिल पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, मनोज पाटील, रविंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील, पितांबर भील,मुक्ताबाई पाटील, लीलाबाई पाटील, भारती पाटील, सरला पाटील, वर्षा पाटील, आस्विनी वाल्हे, दीपाली भील,ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील जवळपास दोन हजार श्रीसेवक व परिसरातील भाविक मोठ्या संख्यने उपस्थित होते. श्रीसेवकांच्या स्वच्छता अभिवान व वृक्षारोपण कार्याचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

*