केसीई व्यवस्थापन मंडळाची निवडणूक बिनविरोध

0
जळगाव । शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाची निवडणूक बिनविरोध ठरली आहे.

एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ म्हणून नावारुपाला आलेल्या खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली

. ही निवडणूक बिनविरोध झाली. व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच इतर सदस्यांचीही निवड करण्यात आली आहे. श्री.बेंडाळे यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्व निवडणूका बिनविरोध झाले असून शिक्षण क्षेत्रात हा एक आदर्श मानला जात आहे.

LEAVE A REPLY

*