रोजगारासाठी कौशल्य विकासाची गरज

0
जळगाव । आजच्या तरुण पिढीस केवळ पदवी प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रोजगार मिळण्यासाठी एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रमोद चिकेरुर यांनी केले.

प्रबोधन संस्थेच्या पुढाकाराने प्रशिक्षणात सामील झालेल्या 148 विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळालेल्या प्रशिक्षण साहित्य वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रमोद चिकेरूर बोलत होते. सुशिक्षीत तरुणांना विविध औद्योगिक संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी मिळण्याच्या दृष्टीने शासनातर्फे प्रधानमंत्री कौशल विकास योजना राबविण्यात येत आहे.

यातून तरुणांमध्ये कौशल्य विकासावर भर देऊन प्रशिक्षीत केले जाते. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणात सहभागी विद्यर्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. यानंतर प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना विविध नोकर्‍यांमध्ये प्राधान्य देण्यात येते. तसेच ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करावयाचा असेल त्यांना सुलभ पद्धतीने कर्ज मिळत असते.

जळगाव शहरात संगणक दुरुस्ती, जी.एस.टी. अकाउंटंट, या सारखे प्रशिक्षण सुरु झाले असून शिवणकाम, मोबाईल दुरुस्ती, ब्युटी पार्लर, आणि कुटीर उद्योगावर आधारित अन्य कोर्सेस लवकरच सुरु होत आहेत अशी माहिती प्रमोद चिकेरूर यांनी दिली. संगणक प्रशिक्षक संकेत भंगाळे, कुणाल चौधरी, आकाश मोटघरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*