रोजगाराभिमुख शिक्षण पद्धतीची आवश्यकता

0
जळगाव । सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता रोजगाराभिमुख शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी केले.

डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात पदव्युत्तर हिंदी विभाग व उमवि आयोजित हिंदी द्वितीय वर्ष कला पाठ्यक्रम निर्धारण कार्यशाळा संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यशाळेचे उद्घाटन धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय, अमळनेर येथील प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.एस. राणे यांनी कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याचे मनोगत व्यक्त केले.

विभाग प्रमुख व कार्यशाळा समन्वयक डॉ.संजय रणखांबे यांनी प्रास्तविक केले. कार्यशाळेत स्त्रोत व्यक्ती म्हणून डॉ. मधुकर खराटे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी द्वितीय वर्ष कला वर्गाच्या हिंदी विषयासाठी नवीन अभ्यासक्रम पुनर्रचना विषयी चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेत उमवि परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील जवळपास 40 प्राध्यापकांचा समावेश होता. तसेच हिंदी अभ्यासक्रम मंडळाचे सर्व सदस्य कार्यशाळेत उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर उमवि अधिसभा सदस्य डॉ.गौतम कुंवर, उपप्राचार्य बी.पी. सावखेडकर, उमवि हिंदी विभागप्रमुख डॉ.सुनिल कुळकर्णी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.डॉ.मनोज पाटील यांनी केले. तर आभार डॉ.देवेंद्र बोंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*