टीम इंडिया मतलबी! ‘वॉ’चा आरोप

0
मेलबर्न । गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट ऑॅस्ट्रेलिया आणि बीसीसीआयमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यावरुन चांगलीच जुंपली होती. पण आता या मुद्द्यावरुन माजी ऑॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क वॉने टीम इंडियाला टार्गेट केले आहे.

टीम इंडियाने अ‍ॅडलेड कसोटी दिवस-रात्र पद्धतीत खेळायला नकार देऊन, आपला मतलबीपणा दाखवला असल्याचे मार्क वॉ म्हणाला.

आपण सर्व सध्या कसोटी क्रिकेटची अवस्था जाणतो आहोत. टी-20 च्या जमान्यात कसोटी क्रिकेट टिकवण्यासाठी दिवस-रात्र कसोटी सामने खेळणे गरजेचे आहे. पण या प्रस्तावाला भारतीय संघाने नकार देत आपला स्वार्थीपणा दाखवून दिल्याचे मार्क वॉने म्हटले.

मार्क वॉने बीसीसीआयवर टीकेची झोड एका रेडीओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत उठवली. दिवस-रात्र कसोटी सामना घेण्याबाबत ऑस्टे्रलियाकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, भारताने याबाबत स्पष्ट नकार दिल्यामुळे कांगारूंचा संताप झाला आहे. शिवाय या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे.

LEAVE A REPLY

*