महिला बॉक्सरचा दिल्लीत विनयभंग

0
नवी दिल्ली । राजधानी दिल्लीत एका महिला बॉक्सरच्या छेडछाडीची घटना समोर आली आहे. येथे काही युवकांनी या महिला बॉक्सरचा विनयभंग करण्याचा आणि त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरोपीशी जबरदस्त झुंज दिली.

ही घटना येथील निहाल विहार भागात रात्री 8.30च्या सुमारास घडली. यावेळी संबंधित बॉक्सरपटू तिच्या काकांसोबत दुचाकीवरून या भागात फिरत होती. तेव्हा, दुचाकीवर स्वार असलेले दोन युवक त्यांच्या भोवती घूटमळू लागले.

प्रकार लक्षात आल्यावर बॉक्सरपटू आणि तिच्या काकांनी त्यांना विरोध केला. यानंतर दुचाकीस्वार युवक थांबले आणि त्यांनी संबंधित बॉक्सर महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून दोन आरोपींना अटक केली. यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली.

पोलीस उपायुक्तांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले, की पीडितेच्या तक्रारीनुसार चौकशीला सुरूवात करण्यात आली असून दोषींना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

*