Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

भारताचा पहिला हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह अंतराळात रवाना

Share
श्रीहरीकोटा   :    इस्त्रोने पीएसएलव्ही सी४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम साधला आहे.
यातील ३० उपग्रह अमेरिका, ऑस्ट्रेलिया,कॅनेडा, स्पेन,कोलंबिया, फिनलँड ,मलेशिया आणि नेदरलँड्सचे आहेत तर भारताच्या पहिल्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

यातील ३० उपग्रह अमेरिका, ऑस्ट्रेलिया,कॅनेडा, स्पेन,कोलंबिया फिनलँड ,मलेशिया आणि नेदरलँड्सचे आहेत तर भारताच्या पहिल्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

११२ मिनिटांच्या प्रक्षेपणात अंतराळात ३१ उपग्रह रवाना झाले आहेत यातील भारताचा उपग्रह सूर्यमालेत ६३० किमीच्या उंचीवर सोडण्यात येईल तर इतर सर्व ५०४ किमी उंचीवर सोडण्यात येतील

३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत

३० उपग्रहांचे एकूण वजन २६१किलो आहे तर भारताच्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचे वजन ३८० किलो आहे.

भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह शेती , मृदा सर्व्हे, वनस्पतीशास्त्र,पर्यावरण,पाणी , किनारी प्रदेश ई. गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणार आहे.

हा उपग्रह २०२३ पर्यंत पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे.

प्रक्षेपण ४ टप्प्यांमध्ये करण्यात आले आहे.

पीएसएलव्हीने केलेले ४५ वे यशस्वी प्रक्षेपण होते.

इस्त्रोने आतापर्यंत ५२ भारतीय तर २३९ परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!