अडावद नूतन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस 

0
अडावद ता.चोपडा :- येथील नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक डी.एस.चित्ते यांनी मार्गदर्शन केले तर योग शिक्षक के.आर.कणखरे , पी डी चौधरी , बि पी महाजन यांनी योग दिनाचे महत्त्व , शरीरशुध्दी सोबत मनशुध्दी साठी योगाचे महत्त्व त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करुन दाखविले .
    या प्रात्यक्षिकांमध्ये विद्यालयातील प्राथमिक विभागाचे ६२५ विद्यार्थी ,माध्यमिक विभागाचे ३२० तर उच्च माध्यमिक विभागाचे १७५ अश्या एकूण ११२० विद्यार्थी,विद्यार्थीनीं प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.यात उभे आसने ,बैठे आसने ,झोपून करावयाचे आसने घेण्यात आली.
तसेच प्राणायाम ,अनुलेख,विलोम,आमरी,भस्त्रिका प्राणायाम घेऊन शेवटी सामुदायिक ॐ कार मंत्र म्हणून समारोप करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे शिक्षक वृंदानी परिश्रम घेतलेत

LEAVE A REPLY

*