पुरुषोत्तम मास (मलमास)

0
॥श्रीकृष्णं शरणं मम् ॥ सर्व विद्यते ब्रह्मविद्या श्रेष्ठ आहे. जीवात्मा म्हणजे 84 लाख योनीतील चैतन्यरूप प्राण ‘जीव’ व या सर्वांना चालवणारी अदृश्य शक्ती ‘शिव’शक्ती प्रकृती व पुरुष जीवाशिवाचे द्वैत संपून चैतन्यास ब्रह्मलीन करणारी विद्या शिकवण त्यास ब्रह्मविद्या म्हणतात. ब्रह्म सत्यम् जगत मिथ्या हा अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करणार्‍या आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी प्रस्थान त्रयी अभ्यासली.

1) 108 उपनिषदे 2) ब्रह्मसूत्र 3) भगवद्गीता जी वेदांत शास्त्राची तीन प्रस्थाने म्हणजे भगवद्प्राप्तीचे मार्ग दाखवणारे ग्रंथ मानले जातात. त्या तिन्हीचा सूक्ष्म अभ्यास करून तो स्वतपाने सिद्ध करून अनुभूती घे. मग आद्य शंकराचार्य यांनी शांकरभाष्य व विवेक चुडामणी हे ग्रंथ संपादित केले. इ.स. 780 ते 820 मध्ये आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्म यास कोणी निर्माण केलेला नाही. त्यास त्यामुळे अंत नाही.

तो वेद उपनिषदप्रणीत आहे. मूळ वेद ग्रंथात या धर्माचे मूळ बीज आहे. वेदोहै अखिल धर्म मुलम् असे शास्त्रकार सांगतात व मनुष्यास देवांनी फक्त बुद्धी, विचार, वैराग्य प्राप्त झाल्याने त्यांनी हे सर्व ग्रंथ युगानयुगे जपून पुढील पिढीत संक्रमित केली आहेत.

कर्मकांड व ज्ञानकांड हे वेदांचे दोन प्रमुख विभाग गणले जातात. यजुर्वेद ग्रंथात कर्मकांड विषयात पूजा, जप, यज्ञ, व्रतवैकल्य यासाठीच्या दैवी उपासना ऐहिक, श्रेयस सुख जे विनाशी आहे त्यांची मांडणी केली आहे. दुसरा भाग ज्ञानकांड, ऋग्वेद ग्रंथात पारलौकिक, प्रेयस ईश, ब्रह्म प्राचीचे सर्व सुक्त वर्णन केले आहे. पृथ्वी आप (जल, पाणी) तेज (अग्नी, सूर्य) वायू व आकाश (गुरुतत्त्व) यांना चालवणार्‍या ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, गणेश, देवीशक्ती, दशदिकमास यांचे उपासना मंत्र समूह आहे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह निघते असे ज्ञान हे पवित्र आहे.

त्यापासून बद्ध व्यक्तीने आचरणात आणून मुमुक्षू (मी कोण आहे हा विचार करण्याचे कृतीचा शोध घेणारी) व त्यासाठी साधना मार्ग जो योग, ज्ञान, भक्ती, राज, सांख्यत्व, विज्ञान यातील एकाचा स्वीकार करून सिद्ध होतो व विश्वाचे आर्त मनात प्रगट होऊन तो संत होऊन जगतो. ज्ञानकांडात ब्रह्मविद्येचा व अध्यात्म ज्ञानाचा समावेश होतो. ज्ञानकांडातच भगवद्गीता व वेदांत वरील गर्भीत अर्थ प्रतिपादित करणारी 108 उपनिषदे यांचा अंतर्भाव आहे. उपनिषद हा वेदांचा अंतिम कृतीत यम, नियम, राम, तितिक्षा आसन, धारणा, ध्यान, समाधी, प्रत्याहार याद्वारे आणण्याचा उपदेश असल्या कारणाने त्यास वेदांत ही संज्ञा देण्यात येते.

अधिक मासात ज्ञानाद्वारे भगवद् समिपता, सलोकता, स्वरुपता यांची स्वप्रयत्नाने अनुभूती घेण्यास भगवान पुराण पुरुषोत्तम श्रीकृष्ण यांच्या उपासनेसाठी हा मधुमास तीन वर्षांनी येतो. त्यांनी मन विषण्ण झालेल्या गलितगात्र अर्जुनास कुरुक्षेत्रावर केलेला उपदेश ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता यांचे चिंतन करण्याचा यथायती प्रयत्न करू या. आपण या ब्रह्मविद्येवरील गीतेचे महाभारत काव्यग्रंथात वर्णन केले त्याचा मराठीत सोपा गोषवारा घेणार आहोत.

कारण भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचे शेवटी जी पुष्पिका मंत्रवाक्य येते तीत आपल्याला तत्सदिती श्रीमद् भगवत गीतास उपनिषत्सु ब्रह्मविद्याचा योगेशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे असा उल्लेख आढळतो – त्वम् तत्त्वमसि यांचा भगवद्गीतेत या ब्रह्मविद्येचे सांगोपांग विवेचन आहे त्या ब्रह्मतत्त्वाशी जोडण्याचे उपाय असल्याने ते योगशास्त्रही आहे. गीता ही सर्वशास्त्रमयी अशी श्री शंकराचार्यांच्या शब्दात समस्त वेदार्थसार संग्रहभूत अशी आहे. स्वत: भगवान गोपालकृष्णांच्या मुखकमलातून प्रगट झाली असल्याने त्यातील कर्म, ज्ञान, भक्ती, वैराग्य यांचा मंगलमय संयोग केलेला आढळतो.

सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज मला शरण या. माझे सर्वव्यायक सहस्त्रअक्ष (1000 डोळे) सहस्त्रबाहू, सहस्थ शीर्ष (डोके 1000) सहस्त्रपाद असे विश्वरूप दर्शन आपल्या बर्हिदृष्टीस जप, तप, पूजा, वैराग्य याद्वारे अंतर्दृष्टीने इंद्रियातीत अनुभूती घ्या. हीच ती ब्रह्मविद्या आपण अर्धांक पुरुषोत्तम मासात सोप्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.
अधिक मास महात्म्य
लेखांक : 3
रवींद्र प्रभाकर देव
9403512988

LEAVE A REPLY

*